Multibagger stock : गुंतवणूकदारांना मिळाला 1150% परतावा, 19 रुपयांवरून हा IPO गेला 246 रुपयांवर

Multibagger stock : एका IPO ने आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. हा IPO 19 रुपयांवरून 246 रुपयांवर गेला आहे. जर तुमच्याकडेही हा IPO असेल तर तुम्हीही मालामाल होऊ शकता. जाणून घ्या सविस्तर माहिती.

शेअरची किंमत

किमतीचा विचार केला तर मागील आठवड्यात शुक्रवारी RVNL शेअरची किंमत सुमारे ₹246 प्रति शेअर पातळीवर होती. रेल्वेचा हा PSU स्टॉक मागील एका महिन्यात सुस्त दिसत असून RVNL च्या शेअरची किंमत YTD कालावधीत अंदाजे ₹182 प्रति शेअरवरून ₹246 प्रति शेअर इतकी झाली आहे.

या कालावधीत एकूण 35 टक्के वाढ नोंदवली आहे. RVNL शेअरची किंमत मागील सहा महिन्यांत अंदाजे ₹165 वरून ₹246 प्रति शेअर पातळीपर्यंत वाढली आहे, जी या कालावधीत 50 टक्के वाढ दर्शवत असते. हा मल्टीबॅगर स्टॉक मागील एका वर्षात प्रति शेअर सुमारे ₹62 वरून ₹246 वर पोहोचला आहे.

या कालावधीत त्यात 300 टक्के वाढ झाली असून लिस्टिंगनंतर, मल्टीबॅगर रेल्वे स्टॉक प्रति शेअर ₹19 ते ₹246 पर्यंत वाढ झाली आहे. हे अंदाजे पाच वर्षांत 1150 टक्के वाढ दर्शवते.

1 लाखाचे झाले 12.50 लाख रुपये

नवीन वर्ष 2024 च्या सुरुवातीला समजा एखाद्या गुंतवणूकदाराने RVNL शेअर्समध्ये ₹ 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल तर त्याची रक्कम ₹ 1.35 लाख झाली असती. तसेच जर एखाद्या गुंतवणूकदाराने सहा महिन्यांपूर्वी RVNL शेअर्समध्ये ₹1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल तर त्याचे ₹1 लाख आज ₹1.50 लाखात बदलले असते.

तसेच समजा एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी RVNL शेअर्समध्ये ₹1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल तर त्याचे पैसे ₹4 लाखात बदलले असतील. जर एखाद्या गुंतवणूकदाराने शेअर सूचीच्या वेळी RVNL चे ₹ 1 लाख किमतीचे शेअर्स खरेदी केले असतील आणि आजही होल्ड राखले असेल, तर त्याचे ₹ 1 लाख आज ₹ 12.50 लाख मध्ये रूपांतरित झाले असते.

Leave a Comment