Multibagger stock : अनेकजण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात. पण काही शेअरमुळे गुंतवणूकदारांचे खूप नुकसान होते. तर काही शेअर्स असे आहेत जे गुंतवणूकदारांना खूप नफा मिळवून देतात. सध्या एक असा शेअर आहे ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना 1 वर्षात दुप्पट पैसे मिळवून दिला आहे. हा स्विस मिलिटरी कन्झ्युमर गुड्स कंपनीचा शेअर्स आहे.
1.21 एकर जमीन खरेदी
शुक्रवारी शेअर बाजारांना दिलेल्या माहितीनुसार या कंपनीने 29.53 कोटी रुपयांना 1.21 एकर जमीन खरेदी केली आहे. आगामी काळात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची पूर्तता करण्यासाठी या जमिनीवर नवीन उत्पादन प्रकल्प उभारण्यात येणार आहे, असे कंपनीचे मत आहे. ही योजना ‘मेक इन इंडिया’ला सपोर्ट करणार आहे, असेही कंपनीने म्हटले आहे.
तिसऱ्या दिवशी अप्पर सर्किट
हे लक्षात घ्या की शुक्रवारी ही बातमी आल्यानंतर कंपनीच्या शेअर्सची किंमत 5 टक्क्यांनी उसळी घेऊन बीएसईमध्ये 28.84 रुपयांची पातळी गाठली आहे. त्यापूर्वी ३० एप्रिल आणि २ मे रोजी कंपनीचे शेअर्स अपर सर्किटवर आले होते. मागील एका वर्षात कंपनीच्या शेअरच्या किमती 106 टक्क्यांपेक्षा जास्त वाढल्या आहेत. म्हणजेच या काळात गुंतवणूकदारांचे पैसे दुपटीहून जास्त वाढले आहेत.
विशेष म्हणजे मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत 60 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. डेटानुसार, मागील 3 महिन्यांत हा स्टॉक 5.8 टक्क्यांनी घसरला आहे. कंपनीची 52 आठवड्यांची उच्च पातळी 32.55 रुपये आहे आणि 52 आठवड्यांची निम्न पातळी 12 रुपये प्रति शेअर इतकी आहे. स्विस मिलिटरी प्रॉडक्ट्स लिमिटेड जीवनशैली उत्पादनांच्या व्यापार आणि विपणनामध्ये गुंतली असून सध्या कंपनीची 180 पेक्षा जास्त शहरांमध्ये उपस्थिती आहे.