Multibagger share : गुंतवणूकदार झाले मालामाल! 76 पैशांवरून ‘हा’ शेअर पोहोचला 600 रुपयांवर

Multibagger share : शेअर मार्केटमध्ये असेही काही शेअर्स असतात, जे आपल्या गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात परतावा देतात. असाच एक शेअर आहे ज्याची किंमत काही वर्षांपूर्वी केवळ 76 पैसे होती. पण आज या शेअरची किंमत 600 रुपयांवर गेली आहे. शेअरमध्ये 78000% ची तुफानी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

76 पैशांवरून शेअर गेला 600 रुपयांपर्यंत

मागील काही वर्षांत स्वान एनर्जी शेअर्समध्ये झपाट्याने वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.हे लक्षात घ्या की 4 मार्च 2004 रोजी स्वान एनर्जीचे शेअर 76 पैशांवर होते. 13 मार्च 2024 रोजी कंपनीचे शेअर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये 608.80 रुपयांवर गेले आहेत.

या कालावधीत कंपनीच्या समभागांनी 78300 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला आहे. स्वान एनर्जी समभागांनी मागील 10 वर्षांत सुमारे 855% परतावा दिला आहे. 14 मार्च 2014 रोजी कंपनीचे शेअर्स 62.15 रुपयांवर होते. आता आज 13 मार्च 2024 रोजी स्वान एनर्जीचे शेअर्स 608.80 रुपयांवर गेल्याचे पाहायला मिळत आहेत.

मिळाला एका वर्षात दुप्पट परतावा

स्वान एनर्जीच्या समभागांनी मागील एका वर्षात 115% परतावा दिला आहे. मागील एका वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहेत. 13 मार्च 2023 रोजी स्वान एनर्जीचे शेअर्स 280.65 रुपयांवर होते. 13 मार्च 2024 रोजी कंपनीचे शेअर्स 608.80 रुपयांवर पोहोचले आहेत.

गेल्या 5 वर्षांत, स्वान एनर्जीचे शेअर्स 485% पेक्षा जास्त वाढले असून 15 मार्च 2019 रोजी कंपनीचे शेअर्स 102.05 रुपयांवर होते. आज म्हणजे 13 मार्च 2024 रोजी स्वान एनर्जीचे शेअर्स 608.80 रुपयांवर गेले आहेत. हे लक्षात घ्या की स्वान एनर्जी शेअर्सची 52 आठवड्यांची उच्च पातळी 782.55 रुपये इतकी आहे. तर त्याच वेळी, कंपनीच्या समभागांची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 193 रुपये इतकी आहे.

Leave a Comment