Mukhyamantri Ladki Bahin Yojana : राज्यात मागील काही दिवसांपासून “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. राज्य सरकारच्या या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत. सरकारच्या या योजनेमुळे राज्यातील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
पण सुरुवातील या योजनेसाठी पात्र महिलांना कागदपत्रांच्या काही जाचक अटी ठेवल्या होत्या. त्यामुळे कागदपत्रे बनवण्यासाठी तहसील कार्यालयांवरील खूप गर्दी होत होती. यामुळे राज्य सरकारकडून लाभार्थी महिलांसाठी कागदपत्रांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. ज्या महिलांकडे डोमिसाइल नाही त्या महिलेकडे 15 वर्षांपूर्वीचं रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला यापैकी एकही कागदपत्र असेल तरी त्या महिलेला या योजनेचा लाभ घेता येईल.
जाणून घ्या नवीन अटी आणि घोषणा
- योजनेसाठी तुम्हाला दि.31 ऑगस्ट, 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. दि.31 ऑगस्ट, 2024 पर्यंत अर्ज केलेल्या महिलांना दि.01 जुलै, 2024 पासून दर महिन्याला रु.1500/- आर्थिक लाभ मिळेल.
- महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला या पैकी कोणते ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राहय धरले जाणार आहे.
- योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळली आहे.
- लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष वयोगट ऐवजी 21 ते 65 वर्ष वयोगट केला आहे.
- परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केल्यास अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्म दाखला,शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र,आधिवास प्रमाणपत्र ग्राहय धरले जाईल.
- रु.2.5 लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसल्यास त्या कुटुंबाकडे पिवळे आणि केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सवलत मिळेल.
- सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुध्दा या योजनेचा लाभ मिळेल.