Mukesh Dalal | काँग्रेसला धक्का! मतदानाआधीच ‘या’ मतदारसंघात भाजप विजयी; पहा, काय घडलं?

Mukesh Dalal won from Surat Lok Sabha Constituency : लोकसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. निवडणुकीचे अजून सहा टप्पे बाकी आहेत. यानंतर 4 जून रोजी निकाल जाहीर होणार आहेत. परंतु याआधीच भाजपने एक जागा जिंकली आहे. मतदानाआधीच या जागेवर भारतीय जनता पार्टीचा उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. गुजरात राज्यातील सूरत लोकसभा मतदारसंघात भाजपने हा विजय मिळवला आहे. सुरत लोकसभा मतदारसंघात मागील दोन ते तीन दिवसांपासून हायव्होल्टेज राजकीय ड्रामा सुरू होता. काँग्रेसचे उमेदवार निलेश कुंभार यांच्या उमेदवारी अर्जाबाबत भाजपकडून आक्षेप नोंदवण्यात आला होता.

काल रविवारी यावर सुनावणी होऊन काँग्रेस उमेदवाराचा अर्ज अवैध ठरवण्यात आला. त्यानंतर आज अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेदरम्यान बहुजन समाज पार्टीचे उमेदवार प्यारेलाल यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे या जागेवर भारतीय जनता पार्टीचा उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. याबाबत अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल असे सांगण्यात आले.

Maharashtra Loksabha Election | बाब्बो.. शिवसेनेला मोठा धक्का..! म्हणून शिर्डीचे खासदार लोखंडे यांच्याबाबत इडीकडे तक्रार

Mukesh Dalal

सूरत मतदारसंघासाठी काँग्रेस उमेदवाराचा अर्ज अवैध ठरल्याने एकूण नऊ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी अपक्षांसह 7 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यानंतर फक्त एकच उमेदवार उरला होता. बहुजन समाज पक्षाचे उमेदवार प्यारेलाल सूरत जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्यानंतर त्यांनी ही उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे फक्त भारतीय जनता पार्टीचे उमेदवार शिल्लक राहिले होते. त्यांच्या विरोधात प्रतिस्पर्धी उमेदवार नसल्याने भाजप उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. यासह 2024 च्या लोकसभा निवडणुकीत सूरत हा देशातील पहिला बिनविरोध निवडणूक झालेला मतदारसंघ ठरला आहे.

येथील राजकीय नाट्यानंतर बसपा उमेदवार प्यारेलाल यांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. प्यारेलाल भारती यांना आमिष दाखवले जात असल्याचा अर्ज बहुजन समाज पक्षाचे सूरत जिल्हाध्यक्ष सुतीश सोनवणे यांनी जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकाऱ्यांकडे दिला आहे. भाजप उमेदवार मुकेश दलाल यांचे निवडणूक प्रतिनिधी दिनेश जोधानी यांनी फॉर्म भरतेवेळी काँग्रेसचे उमेदवार निलेश कुंभानी यांच्या उमेदवारी अर्जाबाबत आक्षेप घेतला होता. काँग्रेस उमेदवाराचा कोणताही प्रस्तावक नसल्याची माहिती असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबतची माहिती काँग्रेस उमेदवाराचे निवडणूक एजंट फिजिक कोल्डी यांना दिली गेली.

Mukesh Dalal

Sharad Pawar | ..म्हणून शरद पवारांनी मागितली मतदारांची माफी; पहा, नेमकं काय घडलं?

या प्रकरणावर काल सुनावणी झाली आणि काँग्रेस उमेदवाराच्या फॉर्मवर प्रस्ताव म्हणून स्वाक्षरी करणारे जगदीश सावलीय, रमेश पोलारा आणि ध्रुविन धमेलिया यांनी निवडणूक अधिकाऱ्यांसमोर हजर होऊन फॉर्मवर सही केली नसल्याचे सांगितले. याचबरोबर एक शपथपत्रही दाखल केले. यानंतर सुनावणी झाली आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी काँग्रेस उमेदवाराचा अर्ज रद्द केला.

Leave a Comment