Muhurat Trading : दिवाळी (Diwali) म्हंटल कि डोळ्यासमोर येतात ते आकाशकंदील, फटाके, फराळ पण या सगळ्यांसोबत शेअर मार्केट (Stock Market) आणि गुंतवणूकदारांसाठी (Investors) अजून एक महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे ‘मुहूर्त ट्रेडिंग’ (Muhurat Trading). शेअर बाजार (Share market) आणि गुंतवणूकदारांसाठी दिवाळीचा सण (Diwali Festival) खूप खास असतो. वास्तविक, शेअर बाजारात दिवाळीनिमित्त खास ट्रेडिंग करण्याची परंपरा खूप जुनी आहे, ज्याला मुहूर्त ट्रेडिंग (Muhurat Trading), म्हणतात. या व्यापारासाठी खास बाजार (Market Opening) उघडला जातो. दिवाळीत दिवसभर शेअर बाजार बंद असले तरी संध्याकाळी लक्ष्मीची पूजेनंतर मुहूर्ताच्या व्यवहारासाठी बाजार १ तास खुला होतो. यानिमित्ताने बाजारात गुंतवणूक करणे शुभ मानले जाते. लहान मोठ्या सर्व प्रकारच्या गुंतवणूकदारांना मुहूर्तावर व्यापार करणे आवडते.

शेअर बाजारात दिवाळीच्या दिवशी एक तास मुहूर्ताचा व्यापार करण्याची परंपरा पाच दशके जुनी आहे. मुहूर्त ट्रेडिंगची प्रथा बीएसईमध्ये (BSE) १९५७ आणि एनएसईमध्ये (NSE) १९९२ मध्ये सुरू झाली. मुहूर्ताचा व्यवहार हा पूर्णपणे परंपरेशी निगडित असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. मुहूर्त ट्रेडिंग दरम्यानच्या या एका तासात गुंतवणूकदार आपली छोटी गुंतवणूक (Small Investment) करून बाजाराच्या जुन्या परंपरेचे अनुसरण करतात. मुहूर्ताच्या व्यवहारात साधारणपणे विक्री होत नाही. त्याऐवजी, गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात स्टॉक (Stock) खरेदी करतात.
यावेळी २४ ऑक्टोबर २०२२ रोजी दिवाळी आहे. या दिवशी, एनएसई (NSE) आणि बीएसई (BSE) वर संध्याकाळी ६.१५ ते ७.१५ पर्यंत मुहूर्त ट्रेडिंग असेल. ब्लॉक डील (Block deal) संध्याकाळी ५.४५ ते ६ वाजेपर्यंत होईल. स्टॉक एक्स्चेंजच्या मते, दिवाळी मुहूर्तावर संध्याकाळी ६:०० ते ६:१५ पर्यंत प्री-ओपन ट्रेडिंग सत्र असेल. मुहूर्ताचा ट्रेंड संध्याकाळी (Stock Exchange) ६.१५ पासून सुरू होईल आणि ७.१५ पर्यंत सुरू राहील.
गतवर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर शेअर बाजारात तेजी आली होती. सेन्सेक्स (Sensex) ३०७ अंकांनी वाढून ६००७९ च्या पातळीवर बंद झाला. त्याचवेळी निफ्टीही (Nifty) ८८ अंकांच्या वाढीसह १७९१७ च्या पातळीवर बंद झाला. बँक (bank),  ऑटो (Auto), फायनान्शिअल (Finance), एफएमसीजी (FMCG), आयटी (IT) आणि रियल्टी (Realty) समभागात चांगली खरेदी झाली. मुहूर्ताच्या ट्रेडिंगवर, एमअँडएम (M&M), आयटीसी (ITC), बजाज ऑटो (BAJAJ-AUTO,) एलटी(LT), कोटक बँक (KOTAK BANK) या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाली होती.
यावर्षी मुहूर्त ट्रेडिंगच्या दरम्यान, सलग दोन दिवस मंदावलेल्या शेअर बाजारात जबरदस्त वाढ अपेक्षित आहे.

Share.

Leave A Reply

Exit mobile version