MSP issue in 2024 । केंद्रातले सरकार प्रत्येक वर्षी 14 खरीप पिकांची एमएसपी जाहीर करते. खरीप पिकांच्या एमएसपीनुसार शेतकरी त्या पिकांच्या पेरणीचे नियाेजन करत असून यंदा मात्र सरकारने एमएसपी जाहीर करण्यास उशीर केला आहे. कमिशन फाॅर ॲग्रीकल्चर काॅस्ट ॲण्ड प्राइजेसच्या माध्यमातून पिकांचा राज्यनिहाय उत्पादन खर्च जाणून घेण्याची प्रक्रिया जानेवारीपासून सुरू करण्यात येते.
तसेच सीएसीपी या पिकांची एमएसपी ठरवून त्यांचा अहवाल दरवर्षी मार्चपूर्वीच केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाला सादर करत असते. त्यानंतर सरकारची कॅबिनेट कमिटी ऑन इकाॅनाॅमिक अफेअर्स सीएसीपीच्या अहवालावर शिक्कामाेर्तब करून एमएसपी जाहीर करत असते. सरकारच्या दिरंगाईमुळे यंदा देशभरातील शेतकऱ्यांना करोडोंचा फटका बसला आहे.
दरम्यान, ही संपूर्ण प्रक्रिया प्रत्येक वर्षी 15 एप्रिल ते 7 मे दरम्यान पूर्ण करून या काळात एमएसपी जाहीर करणे अपेक्षित असून या काळात एमएसपी जाहीर झाला तर शेतकऱ्यांना खरीप पिकांची निवड व नियाेजन करण्यास किमान दीड ते दाेन महिन्यांचा वेळ मिळताे.
पण गेल्या सहा वर्षांपासून खरीप पिकांची एमएसपी जाहीर करण्यास जूनचा निम्मा महिना संपला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना एमएसपीसाठी आणखी किती दिवसांची वाट पाहावी लागणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
केंद्राकडून सन 2018-19 च्या हंगामासाठी 4 जुलै 2018, 2019-20 च्या हंगामासाठी 3 जून 2019, 2020-21 च्या हंगामासाठी 1 जून2020, 2021-22 च्या हंगामासाठी 9 जून 2021, 2022-23 च्या हंगामासाठी 8 जून 2022 आणि 2023-24 च्या हंगामासाठी 7 जून 2023 राेजी एमएसपी जाहीर करण्यात आली हाेती.