मुंबई : ठाकरे सरकारने 3 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याच्या निर्णयाचे शेतकऱ्यांकडून स्वागत होत असतानाच एक धक्कादायक बातमी आली आहे. थकीत वीजबिलांची वसुली उद्यापासूनच (ता.11) सुरु करण्याचा आदेश महावितरणने काढला आहे. त्यामुळे ग्राहकांना जोराचा झटका बसला आहे.
थकीत वीजबिलाची रखडलेली वसुली, दुसरीकडे वीज निर्मिती आणि कर्जावरील व्याजाच्या बोजाखाली महावितरण (Mahavitaran) दबली आहे. त्यामुळे थकीत वीजबिलांची वसुलीशिवाय पर्याय नसल्याचे महावितरण अधिकाऱ्यांनी सांगितले. स्थानिक पातळीवर उद्यापासून (ता.11) थकीत वीजबिलाची वसुली सुरू करण्यात येणार आहे.
कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन (Lock down) करण्यात आले. त्यात लाखो लोकांचे रोजगार बुडाले. दुसरीकडे कोणतेही मीटर रिडींग न घेता, ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिले पाठविण्यात आली. सत्ताधाऱ्यांनी वीज बिलमाफीची (Light Bill) पुडी सोडल्याने लोकांनीही बिले भरली नाहीत. आता सक्तीने वीजबिल वसुली सुरू करण्याचा आदेश देऊन महावितरणने लोकांच्या जखमांवर मीठ चोळले आहे.
पहिला लॉकडाऊन संपताच महावितरणने वाढीव वीजबिल वसुलीसाठी कठोर पावले उचलली होती. आता दुसरा लॉकडाऊन संपताच महावितरणने बिलांच्या वसुलीचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी उद्यापासूनच केली जाणार असल्याने खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या अडचणी वाढणार आहेत.
महावितरणची थकबाकी
- 2020-20 मधील 4099 कोटी
- एप्रिल 2021 मध्ये 849 कोटी
- मे 2021 मध्ये 1386 कोटी
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर महावितरणने वीजबिल वसुलीचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
- कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
- | फेसबुक| ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.