Motorola G04 : त्वरा करा! 7 हजारांपेक्षा स्वस्तात मिळतोय ‘हा’ फोन, सोडू नका अशी संधी

Motorola G04 : तुम्ही आता Motorola चा फोन खूप कमी किमतीत खरेदी करू शकता. या फोनवर तुम्हाला सर्वात शानदार ऑफर मिळत आहे. यामुळे तुमची हजारो रुपयांची बचत होईल. पण Motorola चा हा फोन तुम्हाला 30 मार्चपूर्वी खरेदी करावा लागणार आहे.

ऑफरचा विचार केला तर हा फोन 5,600 रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज बोनससह तुम्ही खरेदी करू शकता. कंपनी काही निवडक मॉडेल्सवर एक्सचेंज ऑफरमध्ये 1,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देत असून हे लक्षात ठेवा की बदल्यात मिळणारी सवलत तुमच्या जुन्या फोनची स्थिती, ब्रँड आणि कंपनीच्या एक्सचेंज पॉलिसीवर अवलंबून असते.

Motorola G04 ची फीचर्स

कंपनी आपल्या या जबरदस्त फोनमध्ये 720×1600 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.6-इंचाचा HD+ डिस्प्ले देत असून हा डिस्प्ले LCD पॅनल 90Hz च्या रीफ्रेश रेटला सपोर्ट करतो. त्याचा आस्पेक्ट रेशो 20:9 इतका आहे. स्टोरेजचा विचार केला तर हा फोन 8 GB पर्यंत रॅम आणि 128 GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज पर्यायामध्ये येतो. प्रोसेसर म्हणून कंपनी या फोनमध्ये Unisoc T606 चिपसेट देत असून फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये LED फ्लॅशसह 16-मेगापिक्सेल सिंगल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध करून देत आहे.

सेल्फीसाठी फोनमध्ये तुम्हाला ५ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. हा फोन 1 TB पर्यंत मायक्रो SD कार्डला सपोर्ट करेल. हा फोन IP52 रेटिंगसह येतो. यामुळे ते धूळ आणि स्प्लॅश प्रूफ बनते. फोनमध्ये देण्यात आलेली बॅटरी 5000mAh आहे. ही बॅटरी 10 वॅट वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते. OS बद्दल बोलायचे झाल्यास फोन Android 14 वर आधारित My UX वर काम करतो.

बायोमेट्रिक सुरक्षेसाठी कंपनी या फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देत असून शक्तिशाली आवाजासाठी, तुम्हाला या फोनमध्ये Dolby Atmos पाहायला मिळेल. हा मोटोरोला फोन सॅटिन ब्लू, कॉन्कॉर्ड ब्लॅक, सी ग्रीन आणि सनराईड ऑरेंज चार रंगांच्या पर्यायांमध्ये येतो.

Leave a Comment