Moscow Concert Hall Attack : रशियाची राजधानी मॉस्को शहरातील एका एका कॉन्सर्ट हॉलवर (Moscow Concert Hall Attak) आज पाच अतिरेक्यांनी भीषण हल्ला केला. पाच अतिरेकी या हॉलमध्ये घुसले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. तसेच येथे ग्रेनेडही फेकले. या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या वेगाने वाढत चालली आहे. मिळालेल्या ताज्या माहितीनुसार या घटनेत आतापर्यंत 150 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो लोक जखमी झाले आहेत. या जखमी लोकांना जवळच्या रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. या जखमींपैकी काही जणांची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे. त्यामुळे मयतांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Russia President Election : रशियातही निवडणुकांची धामधूम; मतदान सुरू, कोण होणार राष्ट्राध्यक्ष?
हा हल्ला काल रात्री झाल्याचे सांगण्यात येत आहे. या ठिकाणी कार्यक्रम सुरू होण्याआधी पाच अतिरेक्यांनी बेछूट गोळीबारास सुरुवात केली. या हल्ल्यात 145 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. या घटनेने देशभरात खळबळ उडाली आहे. तसेच जगभरातून या अतिरेकी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला जात आहे. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, गोळीबार सुरू झाल्यानंतर येथे एक मोठा स्फोटही झाला. टास न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, येथील लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. कॉन्सर्ट हॉलमध्ये आग लागल्यानंतर या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.
Moscow Concert Hall Attack
सोशल मीडियावर शेअर केल्या गेलेल्या काही व्हिडिओत कॉन्सर्ट हॉलमध्ये धावपळ उडाल्याचे दिसत आहे. एका व्हिडिओत हल्लेखोरही दिसत आहेत. क्रॉकस हॉलच्या छतावर आगीचे लोळ दिसत आहेत. आता हे व्हिडिओ त्याच घटनेचे आहेत का याची खात्री अजून झालेली नाही. परंतु, या घटनेमुळे जगभरात खळबळ उडाली आहे.
आरटी रिपोर्टनुसार, मॉस्कोच्या आरोग्य विभागाने सांगितले की 50 अॅम्ब्यूलन्स घटनास्थळी पाठवल्या आहेत. कॉन्सर्ट हॉलच्या तळघरातून आतापर्यंत 100 लोकांना वाचवण्यात यश मिळाले आहे.
Moscow Concert Hall Attack