Morning Habits | लठ्ठपणा जवळही फिरकणार नाही, फक्त सकाळी ‘या’ 5 टिप्स फॉलो कराच!

Morning Habits : आजकाल बदललेल्या जीवन शैलीमुळे अनेक शारीरिक समस्या (Morning Habits) निर्माण झाल्या आहेत. आरोग्याकडे लक्ष देणे सुद्धा कठीण झाले आहे. फास्ट फूड खाण्याचे वाढते प्रमाण, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यांमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. लठ्ठपणाचा त्रासही (Obesity) वाढू लागला आहे. शरीराच्या काही भागात अनावश्यक चरबी जमा होऊ लागते. ज्यामुळे शरीराचा आकार बिघडू लागतो. वाढत्या लठ्ठपणामुळे फक्त कपड्यांची साईज वाढते असे नाही तर हा लठ्ठपणा अनेक गंभीर आजारांना निमंत्रण देणारा ठरतो.

लठ्ठपणामुळेच मधुमेह, रक्तदाब, ब्लड शुगर यांसारख्या अनेक समस्या शरीरात निर्माण होतात. लठ्ठपणा कमी करण्यासाठी लोक खूप व्यायाम करतात. डाएट फॉलो करतात पण बाकीच्या महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. पण तुम्हाला माहीत आहे का की सकाळच्या काही सवयी या समस्येवर फायदेशीर ठरतात.

मॉर्निंग रूटीन ग्रेसलिन आणि लेप्टीन हार्मोन नियंत्रणात आणण्यासाठी फायदेशीर ठरते. योग्य डाएट आणि चांगल्या लाईफस्टाईलमुळे या हार्मोन्सची पातळी नियंत्रित राखण्यास मदत होते. सकाळच्या वेळी काही क्रियाकलाप केल्यास भूक नियंत्रित होण्यास मदत मिळते. चला तर मग जाणून घेऊ या लठ्ठपणा कमी करण्यासाठी कोणत्या टीप्स उपयुक्त ठरू शकतात

Physical Activity and Obesity : बापरे! भारतात वेगात वाढतोय ‘लठ्ठपणा’ WHO ने नेमकं उत्तर दिलं

Morning Habits

सकाळी पाणी प्या

जर लठ्ठपणा कमी करायचा असेल तर दिवसाची सुरुवात पाण्याने करा. सकाळी झोपेतून उठल्यानंतर एक किंवा दोन ग्लास पाणी प्या. पाणी पिण्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत मिळते आणि पोट भरल्यासारखे वाटेल. रिकाम्या पोटी पाणी पिल्याने शरीरात नवी ऊर्जा मिळते आणि पाचन व्यवस्था चांगली राहते. जरी तुमचे वजन नियंत्रणात असेल तरीही सकाळी पाणी पिण्यास हरकत नाही.

प्रोटीन युक्त नाश्ता घ्या

वजन कमी करण्याचा प्लॅन करत असाल तर सकाळचा नाश्ता प्रोटीन युक्त असला पाहिजे. हाय प्रोटीन डाएटचे सेवन केल्याने दिवसभर जास्त भूक लागत नाही. पोट सुद्धा बराच काळ भरलेले राहते. हाय प्रोटीन डाएट मध्ये तुम्ही अंडी, दही, पनीर, प्रोटीन शेक या खाद्य पदार्थांचा समावेश करू शकता.

सकाळचा व्यायाम फायदेशीर

वजन कमी करायचे असेल तर सकाळच्या वेळी थोडा हलका व्यायाम करणे फायद्याचे ठरू शकेल. यासाठी जिममध्ये जाऊन व्यायाम करण्याची काहीच गरज नाही. रोज सकाळी काही अंतर पायी चालणे, सकाळच्या वेळी योगा करणे, एरोबिक व्यायाम करून मेटाबोलिजमला बूस्ट करता येऊ शकते.

Morning Habits

Healthy Hearth Test treatment  : या ५ टेस्ट नियमित करा हाटॅअॅटॅकपासून रहाल दूर

सकाळचं ऊन फायदेशीर

जर लठ्ठपणा कमी करायचा असेल तर सकाळच्या कोवळ्या उन्हात काही वेळ थांबा. यामुळे शरीरातील व्हिटॅमिन डी ची कमतरता भरून निघते. तसेच चांगली झोप लागण्यास मदत मिळते. त्यामुळे सकाळी काही वेळ उन्हात थांबणे फायदेशीर ठरू शकेल. योगा, प्राणायाम, ध्यान या गोष्टींकडे लोकांचा कल आता वाढू लागला आहे. नियमित ध्यान केल्याने तणाव कमी होण्यास मदत मिळते.

टीप : या लेखातील माहिती फक्त माहिती देण्याच्या उद्देशाने आहे त्याचा व्यवसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून अर्थ लावला जाऊ नये आपल्याला काही समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

Leave a Comment