Monsoon Updates : मान्सून देणार दिलासा! महाराष्ट्रात कोसळणार धो धो पाऊस

Monsoon Updates : देशातील बहुतेक भागात सध्या कडक उन्हाळ्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यामुळे देशात आता मान्सूनची प्रतीक्षा आहे. तर याबाबत आता एक दिलासादायक माहिती समोर आली आहे.

 खाजगी हवामान संस्था स्कायमेटने आपल्या ताज्या अंदाजमध्ये यावेळी देशात मान्सून सामान्य राहणार असल्याची माहिती दिली आहे. तर महाराष्ट्रासह देशातील इतर काही राज्यांमध्ये मान्सून मध्ये मुसळधार पावसाची शक्यता देखील स्कायमेटने वर्तवली आहे.

स्कायमेटने आपल्या नवीन अंदाजात म्हटले आहे की यावेळी देशात जून ते सप्टेंबर दरम्यान 868.6 मिमी पाऊस होऊ शकते तर याकाळात 96-104 पावसाची टक्केवारी राहणार आहे. मात्र अंदाजात स्कायमेटने यावेळी देशात मान्सून उशिरा प्रवेश करणार असल्याचं अंदाज व्यक्त केला आहे.

 स्कायमेटने माहिती देत म्हंटले आहे की, ‘अल निनो’ ते ‘ला नीना’मध्ये बदल होत असल्याने देशात यावेळी मान्सून उशिरा पोहचणार आहे. देशात पावसासाठी पहिल्यापेक्षा हंगामाच्या उत्तरार्धात परिस्थिती चांगली असेल. देशाच्या दक्षिण, पश्चिम आणि उत्तर-पश्चिम भागात पुरेसा आणि चांगला पाऊस अपेक्षित आहे.

या राज्यांमध्ये चांगल्या पावसाची शक्यता

स्कायमेटने माहिती देत म्हंटले आहे की, मध्यप्रदेश महाराष्ट्र मध्ये यावेळी मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. तर बिहार, झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये जुलै आणि ऑगस्टमध्ये कमी पावसाची शक्यता आहे.ईशान्य भारतात मान्सूनच्या सुरुवातीला पाऊस सामान्यपेक्षा कमी असेल अशी माहिती स्कायमेटने दिली आहे.

 उष्णतेची लाट कायम राहणार

भारतीय हवामान विभागानुसार, मान्सूनसोबतच उष्णतेची लाट देखील देशाच्या काही भागात कायम राहणार आहे.ऑगस्ट ते जून या कालावधीत देशातील काही भागात 10 ते 20 दिवस उष्णतेची लाट राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.

Leave a Comment