Monsoon Updates : महाराष्ट्रासह देशातील काही राज्य सध्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. यामुळे काही ठिकाणी पाणी जमा झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
तर दुसरीकडे गुजरात, हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये पाऊस आणि पुरामुळे लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
पुढील पाच दिवस पावसाचा इशारा
आयएमडीने पुढील पाच दिवसांसाठी इशारे जारी केले आहेत कारण अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, महाराष्ट्र, गुजरात, ओडिशा आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये कोणताही दिलासा दिसत नाही. 21 ते 23 जुलै दरम्यान जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान आणि मुझफ्फराबादमध्ये हलका पाऊस पडू शकतो.
21-24 जुलै दरम्यान हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि पूर्व राजस्थानमध्ये पाऊस सुरू राहील. 22 जुलै रोजी पंजाब आणि हरियाणामध्ये 23-25 जुलै दरम्यान पश्चिम राजस्थान, 24 जुलैला पश्चिम उत्तर प्रदेशात आणि 25 जुलैला पूर्व उत्तर प्रदेशात पाऊस पडेल. 21-22 जुलै रोजी उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
हवामान खात्यानुसार, कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र आणि गुजरातच्या काही भागात पुढील 5 दिवसांत मुसळधार पाऊस पडेल. पुढील 24 तासांत मुंबईत काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे.