Monsoon Update: विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह ‘या’ भागात मुसळधार पावसाचा इशारा; अलर्ट जारी

Monsoon Update: देशातील बहुतेक भागात सध्या मान्सूनच्या आगमनानंतर मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. देशाची राजधानी दिल्लीसह अनेक भागात आता मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेकांना दिलासा देखील मिळत आहे.

यातच येत्या काही दिवसात महाराष्ट्रातील अनेक भागात तसेच देशात मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. 

तर दुसरीकडे उत्तर भारतातील अनेक भागात अजूनही मुसळधार पाऊस सुरू आहे. उत्तर भारतातील अनेक भागात पावसामुळे नद्या-नाल्यांनाही पूर आला आहे. याशिवाय दक्षिण भारतातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे सगळेच चिंतेत आहेत. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने  देशाच्या अनेक भागांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

या भागात मुसळधार पाऊस पडेल

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हरियाणा, राजस्थान, हिमाचल आणि उत्तर प्रदेशात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय बिहार आणि झारखंडसह देशातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

तसेच पुढील 2 दिवस कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. याच बरोबर मुंबई आणि ठाण्यात देखील मुसळधार पाऊस सुरू राहणार आहे. तर विभागानुसार, विदर्भात तुरळक पावसाचा अंदाज आहे.

तर मध्य भारतातील राज्यांमध्ये आणि ईशान्य भारतात येत्या काही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

राजधानी दिल्लीत 1936 नंतर गेल्या 88 वर्षांत जूनमध्ये सर्वाधिक पाऊस झाला. 1901 ते 2024 या कालावधीतील हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक पाऊस असेल, असा इशारा देण्यात आला आहे. राजधानी दिल्लीत पुढील दोन दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. शनिवारी येथे दाट ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे. यासोबतच मध्यम मुसळधार पावसाचा अंदाज आहे. वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.

Leave a Comment