सोलापूर : भारतीय हवामान खात्याच्या प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांचे कडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार (Regional Meteorological Center, Mumbai, Indian Meteorological Department) सोलापूर जिल्ह्यामध्ये दिनांक २२ जून ते २६ जून २०२२ दरम्यान काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस ते ३६ अंश सेल्सिअस पर्यंत तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस ते २५ अंश सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आद्रता ६९ ते ८२ % तर दुपारची सापेक्ष आद्रता ४६ ते ७२ % दरम्यान राहण्याची शक्यता आहे. वार्याचा वेग ताशी १३ किमी ते २५ किमी पर्यन्त राहण्याची शक्यता आहे, असे हवामान अंदाजावर आधारित कृषि सल्ला समितीने (ग्रामीण कृषि मौसम सेवा, जिल्हा कृषि हवामान केंद्र, कृषि विज्ञान केंद्र , मोहोळ , सोलापूर) म्हटले आहे.
Maharashtra Political Crisis Live Updates : ‘मी पुन्हा येईन’लाही झटका..! पहा ठाकरेंनी काय निर्णय घेतलाय दणक्यात https://t.co/tjb7aqZkXw
— Krushirang (@krushirang) June 21, 2022
त्यांनी पुढे म्हटले आहे की, विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस( मध्य महाराष्ट्रात विभागात (सोलापूर, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर) (Central Maharashtra Division (Solapur, Dhule, Nandurbar, Jalgaon, Nashik, Ahmednagar, Pune, Satara, Sangli, Kolhapur)) दिनांक २६ जून ते ०२ जुलै २०२२ दरम्यान पावसाचे प्रमाण सरासरी पेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान सरासरीपेक्षा मध्यम कमी राहण्याची शक्यता आहे. किमान तापमान सरासरी एवढे राहण्याची शक्यता आहे. जमिनीची पूर्व मशागत करून शेत पेरणीसाठी तयार ठेवावे. चांगला पाऊस झाल्यावर (२-३ दिवसात ७५ ते १०० मिमी ) वापशावर पेरणी करावी.
Maharashtra Political Crisis Live Updates: सरकार पडल्यास NCP घेणार ‘अशी’ भूमिका; शरद पवार म्हणाले… https://t.co/nw1WTB5sgw
— Krushirang (@krushirang) June 21, 2022
खरीप हंगाममध्ये जनावरांच्या खाद्यासाठी पुढील चारा पिकाच्या वाणांची निवड करावी. ज्वारी : रुचिरा, फुले अमृता, माळदंडी ३५-१, फुले गोधन या वाणांची निवड करावी. मका : आफ्रिकन टॉल, मांजरी कंपोजिट, विजय, गंगा सफेत – २ या वाणांची निवड करावी. संकरीत नेपियर गवत : फुले जयवंत, फुले गुणवंत या वाणांची निवड करावी. जनावरांना लाळखुरकत, फऱ्या व घटसर्प या रोगांच्या एकत्रित रोगप्रतिबंधक लसी टोचून घ्याव्यात. (Choose varieties of fodder crop: Sorghum: Ruchira, Phule Amrita, Maldandi 35-1, Phule Godhan Varieties. Maize: African Toll, Cat Composite, Vijay, Ganga Safet – 2 varieties. The animals should be vaccinated against the common diseases of salivary glands, diphtheria and gonorrhea (Rural Agriculture Meteorological Service, District Krishi Meteorological Center, Krishi Vigyan Kendra, Mohol, Solapur))
President Election 2022: IAS बाबू होणार राष्ट्रपतीपदाचे दावेदार..! पहा यशवंत सिन्हा यांचा जीवनप्रवास https://t.co/8ezRlvXvq8
— Krushirang (@krushirang) June 21, 2022