Monsoon In Maharashtra: आनंदाची बातमी! महाराष्ट्रात दाखल होणार मान्सून; ‘या’ भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस

Monsoon In Maharashtra: राज्यात उन्हाळ्यामुळे अनेकांचे हाल होत आहे त्यामुळे अनेक जण आता आतुरतेने मान्सूनची वाट पाहत आहे. तर आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार मान्सून गुरुवारी महाराष्ट्राच्या खालच्या कोकण भागात दाखल होऊ शकतो.

यामुळे गुरुवारपासून मुंबईच्या बहुतांश भागात पावसाचा जोर वाढणार असून आठवड्याच्या शेवटी मध्यम ते जोरदार पाऊस सुरू होईल.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मान्सून येत्या दोन-तीन दिवसांत मध्य अरबी समुद्र, कर्नाटक, दक्षिण महाराष्ट्र आणि गोव्याकडे सरकणार आहे. मान्सूनचा वेग असाच सुरू राहिल्यास मुंबईत 9 ते 10 जूनपर्यंत मान्सूनची सुरुवात होण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याने 8 आणि 9 जून रोजी कोकण, गोव्यात काही ठिकाणी मुसळधार (64.5-115.5 मिमी) ते खूप मुसळधार (115.5-204.4 मिमी) पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्याचवेळी 9 जून रोजी मध्य महाराष्ट्रात विविध ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे.

आजपासून मुंबईत पाऊस आणि गडगडाटाची शक्यता   

बुधवारी सकाळी मुंबईतील अनेक भागात मान्सूनपूर्व पाऊस झाला.  सकाळी 7 वाजल्यापासून मुंबईच्या काही भागात हलका पाऊस सुरू झाला.

बीएमसीच्या म्हणण्यानुसार, शहरातील दादर, कांदिवली, मागठाणे, ओशिवरा, वडाळा, घाटकोपर इत्यादी भागात सकाळी 7 ते 8 या वेळेत 4 मिमी ते 26 मिमी पाऊस झाला. मध्य आणि दक्षिण मुंबईतही काही ठिकाणी हलका पाऊस झाला.

मुंबईत मान्सून साधारणपणे जूनच्या दुसऱ्या आठवड्यात दाखल होतो. गेल्या महिन्यात मुंबईत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला होता, त्यामुळे घाटकोपर परिसरात होर्डिंग कोसळून 14 जणांचा मृत्यू झाला होता, तर डझनभर गंभीर जखमी झाले होते.

Leave a Comment