Monsoon Destinations : पावसाळ्याच्या दिवसात फिरायला जायचंय पण बजेट कमी आहे? ‘ही’ ठिकाणे आहेत तुमच्यासाठी उत्तम पर्याय

Monsoon Destinations : जर तुम्हाला पावसाळ्याच्या दिवसात फिरायला जायचं आहे पण तुमचे बजेट खूप कमी असेल तर काळजी करू नका. तुम्ही आता ठिकाणी जाऊ शकता जिथे बजेट खूप कमी आहे. कोणती आहेत ही ठिकाणे जाणून घ्या सविस्तरपणे.

कोकण किनारा – कोकण किनारपट्टी, मुंबई ते गोव्याच्या दक्षिणेकडे जाणारा किनारा हा त्याच्या सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी ओळखण्यात येतो. हे ठिकाण समुद्रकिनारे, हिरवीगार भातशेती, टेकड्या आणि किल्ल्यांचे अवशेष यामुळे अधिकच सुंदर बनले आहे. नयनरम्य दृश्य असणारे हे ठिकाण पावसाळ्यात पाहण्यासारखे आहे.

गोवा- पर्यटकांमध्ये गोवा हे एक चांगले ठिकाण मानले जात असून नारळाची झाडे, वसाहतींचा वारसा, पोर्तुगीज इमारती, स्वादिष्ट पाककृती आणि सुंदर समुद्रकिनारे ही गोव्याची ओळख आहे. कमी बजेटचा प्रवास, समुद्रकिनारे, गुलाबी आकाश यामुळे हे मान्सून डेस्टिनेशन अधिक खास बनते.

केरळ- सर्वात महत्त्वाचे म्हणजे समृद्ध वनस्पती, जैविक विविधता आणि ग्रामीण जीवनाचे सौंदर्य असल्याने हे भेट देणाऱ्या पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. समुद्राच्या शांत किनाऱ्यावरची एक सुखद संध्याकाळ आणि बोटीचा प्रवास तुम्हाला येथे खास अनुभव देतो. प्रत्येक वर्षी पावसाळ्याच्या दिवसात लांबून पर्यटक केरळला भेट देण्यासाठी येतात.

कूर्ग- हा कर्नाटकच्या नैऋत्य भागात पश्चिम घाटाजवळ स्थित एक डोंगरी जिल्हा असून येथे समुद्रसपाटीपासून सुमारे 900 मीटर ते 1715 मीटर उंचीवर वसलेले आहे. विशेष म्हणजे या ठिकाणाला भारताचे स्कॉटलंड असेही म्हणतात. येथे दुब्बर एलिफंट कॅम्प, ताल कावेरी, कुक्के सुब्रमण्यम, कासारगोड आणि कन्नूर सारखी अनेक सुंदर पर्यटन स्थळे पाहण्यासारखी आहेत.

लडाख- अप्रतिम सौंदर्य असलेले लडाख पर्यटकांमध्येही प्रसिद्ध असून डोंगराच्या कडेला, जोरदार वारे आणि नैसर्गिक सौंदर्यात तुम्हाला असे वाटेल की पृथ्वीवर कदाचित यापेक्षा चांगले दुसरे कोणतेही ठिकाण नाही. तुम्हाला पावसाच्या थेंबात भिजण्याची आवड असल्यास पावसाळ्यात एकदा लडाखला भेट द्यायला विसरू नका.

Leave a Comment