Monsoon Alert: पुणे : पहिल्या टप्प्यात काही ठिकाणी जोरदार पाणी, तर काही ठिकाणी दुष्काळ अशी स्थिति निर्माण झाल्याने यंदा शेतकऱ्यांचे काय होणार याची भीती निर्माण झाली आहे. अशावेळी आता पुन्हा एकदा अवघ्या महाराष्ट्रात जोरदार पाऊस (indications of heavy rains in Maharashtra) होण्याचे संकेत हवामान विभागाने (weather forecast received from the Regional Meteorological Center of Mumbai) दिलेले आहेत. राज्यात किरकोळ पाऊस वगळता मंगळवारपर्यंत उघडीप मिळाली होती. मात्र, आता वातावरणात झालेल्या बदलामुळे सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या दहा जिल्ह्यांत दमदार पावसाची शक्यता आहे. (heavy rain in ten districts namely Sindhudurg, Kolhapur, Sangli, Solapur, Osmanabad, Latur, Nanded, Yavatmal, Chandrapur, Gadchiroli)
बुधवारी सकाळपासूनच पावसाला अनुकूल वातावरण तयार झाले असून नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातील सर्व धरण क्षेत्रात तसेच कोयना धरण परिसर, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील घाट-माथ्यावरील भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. (heavy rain in all the dam areas of Nashik, Ahmednagar district as well as Koyna Dam area, Kolhapur and Ghat-top areas of Satara district) नद्या-नाल्यांना पूर येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनीही सावधगिरी बाळगावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्रातून मिळालेल्या अंदाजानुसार ४ ऑगस्ट रोजी औरंगाबाद, जालना, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, उस्मानाबाद व बीड या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. ५ ऑगस्ट रोजी नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात (Nanded, Latur and Osmanabad districts) मुसळधार पावसाची तर बीड, परभणी व हिंगोली जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाची (rain in Beed, Parbhani and Hingoli districts) शक्यता आहे. ६ ऑगस्टला नांदेड, हिंगोली व परभणी जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. (Heavy rain is likely at some places in Nanded, Hingoli and Parbhani districts on August 6)