Monsoon 2024 Updates | शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज! ‘मान्सून’चा अंदाज मिळाला; पहा, यंदा कसं राहिल पाऊसमान?

Monsoon 2024 Updates : देशासह महाराष्ट्रात सध्या कडाक्याचा उन्हाळा जाणवत (Monsoon 2024 Updates) आहे. काही राज्यांमध्ये उष्णतेने तर अगदीच कहर केला आहे. उष्णतेच्या लाटेचा नागरिकांना सामना करावा लागत आहे. दिवसाच्या ताम्हणात प्रचंड वाढ होत आहे. काही ठिकाणी तापमान 45 अंशांच्याही पुढे गेले आहे. त्यामुळे दिवसा नागरिकांना घराबाहेर पडणेही मुश्किल झाले आहे. अशा परिस्थितीत काही ठिकाणी मात्र अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. परंतु हा अवकाळी पाऊस शेतकऱ्यांसाठी नुकसानदायक ठरत आहे. आणखीही काही दिवस हा अवकाळी पाऊस सुरू राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

मान्सून सुरू होण्यास आणखी दोन महिन्यांचा तरी काळ बाकी आहे. परंतु या मान्सूनसंदर्भात हवामान विभागाने एक अंदाज वर्तवला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार यंदा मान्सूनचे वेळेवर आगमन होईल. तसेच या वर्षात देशात समाधानकारक पाऊस होण्याची शक्यता आहे. देशात सरासरी 106% पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Monsoon Updates : मान्सून देणार दिलासा! महाराष्ट्रात कोसळणार धो धो पाऊस

हवामान विभागाच्या या अंदाजाने यंदाही पाऊस समाधानकारक असेल अशी खात्री बाळगता येईल. मान्सून सुरू होण्यास अजून अडीच महिन्यांचा काळ बाकी आहे. देशात साधारणतः जून महिन्यात मान्सूनचे आगमन होते तर महाराष्ट्रात 15 जून नंतर पाऊस पडण्यास सुरुवात होते. मागील काही काळांपासून पावसाचे हे चक्र मात्र बिघडले आहे. पाऊस काही वेळेस वेळेवर दाखल होतो तर काही वेळेस मात्र जून महिना उलटला तरी पावसाचा मागमूस देखील नसतो. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.

Monsoon 2024 Updates

यंदा मात्र पाऊस वेळेवर होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांसाठी आणि नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी त्रास सहन करावा लागणार नाही अशी अपेक्षा आहे.

Rain Tax : अर्र.. आता पावसाच्या पाण्यावरही टॅक्स; पहा, कुणी घेतलाय ‘हा’ अजब निर्णय

दरम्यान, देशभरात सध्या कडाक्याचा उन्हाळा जाणवत आहे. एप्रिल महिन्याच्या मध्यावर सूर्य आग ओकू लागला आहे. महाराष्ट्रातही कडाक्याचा उन्हाळा जाणवत आहे. विदर्भातील काही जिल्हे चांगलेच तापले आहेत तर उर्वरित महाराष्ट्रातही कडाक्याचा उन्हाळा जाणवत आहे. दुपारच्या वेळी तापमानात मोठी वाढ होत आहे तर रात्रीच्या वेळी तापमान मात्र कमी होताना दिसते. या उन्हाळ्याच्या दिवसातच मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.

Monsoon 2024 Updates

राज्यातील मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसासह गारपीट झाली आहे. यावेळी पडलेल्या पावसाने पिकांचे मात्र मोठे नुकसान केले आहे. शेतकऱ्यांना या पावसामुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. शेतात काढणीला आलेली पिके पाहता पाहता जमीनदोस्त झाली आहेत. त्यामुळे या पिकांचा पंचनामा करून शासनाने लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता पुढे येऊ लागली आहे.

Leave a Comment