Monkeypox : मंकीपॉक्स (Monkeypox) आजाराबाबत देशात आणि जगात अतिशय भीतीदायक वातावरण आहे. येथेही मंकीपॉक्सचा रुग्ण समोर आल्याने देशात खळबळ उडाली आहे. भारतात आतापर्यंत एकूण 4 बाधितांची नोंद झाली आहे. दरम्यान, केंद्र सरकारने देशातील मंकीपॉक्सच्या प्रकरणांवर लक्ष ठेवण्यासाठी एक टास्क फोर्स (Task Force) स्थापन केला आहे. या टीमचे नेतृत्व नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल (V. K. Paul ) करतील आणि सदस्यांमध्ये केंद्रीय आरोग्य, फार्मा आणि बायोटेक मंत्रालयाच्या सचिवांचा समावेश असेल.
वास्तविक, मंकीपॉक्स धोक्यांदरम्यान केंद्र सरकारने त्याच्याशी सामना करण्यासाठी एक टास्क फोर्स तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. टास्क फोर्स चाचणी सुविधांचा विस्तार करण्यापासून ते लस तयार करण्यापर्यंत सरकारला मार्गदर्शक तत्त्वे देईल. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, मांकीपॉक्स आजाराचा सामना करण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी केलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी एक बैठक झाली. यावेळी या टास्क फोर्सचा निर्णय घेण्यात आला.
Heart Attack : आजच ‘या’ 3 वाईट सवयी टाळा, नाहीतर येऊ शकतो तुम्हाला हृदयविकाराचा झटका https://t.co/tY9RbEHNMI
— Krushirang (@krushirang) July 31, 2022
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले की, नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही के. पॉल यांच्या देखरेखीखाली पाच सदस्यीय टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. या टास्क फोर्समध्ये केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्याशिवाय जैवतंत्रज्ञान विभागाचे सचिव आणि फार्मा संबंधित वरिष्ठ अधिकारीही असतील. वेगवेगळ्या मंत्रालयांशी संबंधित या अधिकाऱ्यांना एका टीममध्ये ठेवण्यात आले आहे.
विविध विभागांना टास्क फोर्समध्ये जोडण्यात आले जेणेकरून भविष्यात कोणत्याही प्रकारच्या आव्हानाला तोंड देता येईल. वास्तविक, प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत टास्क फोर्स स्थापन करण्यावर विचार करण्यात आला. यादरम्यान राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था आणि आरोग्य महासंचालकांना मंकीपॉक्स संबंधित प्रकरणांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.
LPG Price Today: ऑगस्टच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना दिलासा; LPG च्या दरात ‘इतकी’ कपात https://t.co/OIQVyeRZV2
— Krushirang (@krushirang) August 1, 2022
देशात 13 जुलै रोजी मंकीपॉक्सचा पहिला संसर्ग केरळमध्ये (Kerala) आढळून आल्याची माहिती आहे. यानंतर आतापर्यंत एकूण 4 बाधितांची नोंद झाली आहे. दुसरीकडे, या घातक आाजाराचा कहर जगभरात वाढत आहे. आफ्रिकेबाहेर (Africa) गेल्या काही दिवसांत मंकीपॉक्सचा संसर्ग 75 हून अधिक देशांमध्ये पोहोचला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने अलीकडेच खात्री केली आहे की 20 हजारांहून अधिक लोकांना या आजाराने संक्रमित केले आहे.