मुंबई – आयपीएलच्या (IPL) अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकली तेव्हा सर्वांना वाटले की सॅमसनचे नशीब बदलणार आहे, कारण या हंगामातील 16 पैकी 13 सामन्यात नाणेफेक राजस्थान संघाच्या बाजूने नव्हती. अशा स्थितीत अंतिम फेरीत नाणेफेक जिंकणे ही महत्वाची गोष्ट होती, पण पुढच्या काही तासांत संघाचे नशीब फिरले आणि संघाने सामना गमावला. मात्र, असे असतानाही आयपीएलच्या आयोजकांकडून राजस्थान रॉयल्सला मोठी रक्कम मिळाली आहे.

राजस्थानचा संघ आयपीएलच्या पहिल्या सत्राचा विजेता ठरला होता, मात्र आता 14 वर्षांनंतरही आयपीएलची ट्रॉफी उचलता आलेली नाही. गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) राजस्थान संघावर 7 विकेट्सने मात करत आयपीएल पदार्पणात धमाकेदार कामगिरी केली. हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वातील संघाने संयमाने खेळ केला आणि विजेतेपदाचा सामना जिंकण्यात यश मिळविले. कर्णधार हार्दिकने स्वतः संघाचे नेतृत्व केले. त्याने गोलंदाजी करताना 3 विकेट्स घेतल्या आणि फलंदाजी करताना कमी धावसंख्येच्या सामन्यात 34 धावा केल्या आणि तो सामनावीर (Man Of The Match) ठरला.

त्याच वेळी, जर आपण आयपीएल 2022 च्या बक्षीस रकमेबद्दल (IPL Prize Amount) सांगितले तर, विजेता संघ गुजरात टायटन्सला आयपीएलच्या आयोजकांकडून 20 कोटी रुपयांचा धनादेश मिळाला. याशिवाय संघाला ट्रॉफीही प्रदान करण्यात आली. त्याचवेळी विजेतेपदाचा सामना गमावलेल्या राजस्थान रॉयल्सवर पैशांचा पाऊस पडला. संजू सॅमसनच्या (Sanju Samson) नेतृत्वातील संघाला उपविजेता म्हणून 12.50 कोटी रुपयांचा धनादेश देण्यात आला. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या आरसीबीला 7 कोटी रुपये, तर लखनऊ सुपर जायंट्सला चौथ्या क्रमांकासाठी 6.50 कोटी रुपये मिळाले.

Jio चा IPL धमाका प्लान..! खास आयपीएलसाठी आणलाय ‘हा’ रिचार्ज प्लान; पहा, किती पैसे होतील खर्च

Share.

Leave A Reply

Exit mobile version