Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

कच्चे तेल भडकले..! फक्त 5 महिन्यांत किंमती ‘इतक्या’ वाढल्या; जाणून घ्या, महत्वाची माहिती..

मुंबई – कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीं दरम्यान पुन्हा एकदा तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये (Petrol Diesel Price Today) कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे किमती सध्या तरी स्थिर आहेत. मात्र, कच्च्या तेलाचे वाढत जाणारे भाव (Crude Oil Price Increase) पाहता आणखी किती दिवस इंधनाच्या किंमती स्थिर राहतील, हे मात्र निश्चित नाही. देशाची राजधानी दिल्लीत आज पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. मात्र याच दरम्यान कच्च्या तेलाच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे.

Advertisement

31 डिसेंबर 2021 रोजी कच्च्या तेलाचे एक बॅरल $ 77.78 होते. जे आता $122.01 पर्यंत वाढले आहे. म्हणजेच गेल्या 5 महिन्यांत कच्च्या तेलात प्रति बॅरल 45 डॉलरची वाढ झाली आहे. देशात मात्र 85 टक्के तेल बाहेरच्या देशांकडून खरेदी करावे लागते. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीचा मोठा परिणाम येथील इंधनाच्या भावावर होतो. तेलाच्या किंमती वाढल्या की कंपन्या आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी इंधनाचे भावात वाढ करतात. सरकार मात्र इंधनावरील कर कमी करण्याचा फारसा विचार करत नाही. त्यामुळे या किंमतीचा सगळा भार नागरिकांवर पडतो. सध्या देशात अनेक ठिकाणी पेट्रोल 110 रुपये लिटर दराने विक्री होत आहे. त्यामुळे लोकांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.

Loading...
Advertisement

आज दिल्लीत (Delhi) पेट्रोल 96.72 रुपये तर डिझेल 89.62 रुपये आहे. मुंबईत (Mumbai) पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये आहे. लखनऊमध्ये (Lucknow) डिझेल 89.76 रुपये तर पेट्रोल 96.57 रुपये दराने मिळत आहे. गुवाहाटीमध्ये (Guwahati) पेट्रोल 96.01 रुपये आणि डिझेल 83.94 रुपये दराने मिळत आहे. कोलकाता (Kolkata) शहरात पेट्रोल 106.03 रुपये तर डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर दराने विक्री होत आहे.

Advertisement

.. तर आणखी कमी होणार पेट्रोलचे दर.. तेल उत्पादक देशांनी घेतला ‘हा’ निर्णय.. जाणून घ्या..

Advertisement
Advertisement

Leave a Reply