Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

शेअर बाजारात भूकंप; गुंतवणुकदारांना धक्का, जाणुन घ्या लेटेस्ट अपडेट

मुंबई – जागतिक बाजारातून मिळालेल्या कमजोर संकेतानंतर देशांतर्गत शेअर बाजारात (Share market) घसरण दिसून आली. आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी, 30 अंकांचा सेन्सेक्स 1100 हून अधिक अंकांच्या घसरणीसह 53,184.61 अंकांवर उघडला. तर 50 अंकांचा निफ्टी 300 अंकांपेक्षा अधिक घसरला आणि 15,877.55 च्या पातळीवर उघडला. प्री-ओपन सत्रादरम्यान, सर्व 30 सेन्सेक्स समभाग लाल चिन्हांसह व्यवहार करताना दिसले.

Advertisement

अमेरिकन बाजारातही घसरण
दुसरीकडे जागतिक बाजारातही घसरण दिसून आली. शुक्रवारच्या ट्रेडिंग सत्रात अमेरिकेचा बाजार खराब झाला आणि डाऊ जोन्स 880 अंकांची घसरण करून दिवसाच्या नीचांकी पातळीवर बंद झाला. नॅस्डॅकमध्ये 3.5 टक्क्यांची घसरण दिसून आली. आयटी, बँका आणि ग्राहक समभागांसह सर्व 11 क्षेत्रांमध्ये विक्रीचा दबाव होता. याशिवाय युरोपीय आणि आशियाई बाजारातही घसरण पाहायला मिळाली.

Loading...
Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Advertisement

शुक्रवारी शेअर बाजाराची स्थिती
याआधी शुक्रवारी, आठवड्यातील शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी, सेन्सेक्सने 1016 अंकांची घसरण केली होती. खुल्या शेअर बाजाराने शुक्रवारी घसरणीनंतर दबावाखाली व्यवहार केले आणि अखेरीस 1,016.84 अंकांनी घसरून 54,303.44 वर बंद झाला. त्याचप्रमाणे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 276.30 अंकांनी घसरला आणि 16,201,80 अंकांवर बंद झाला होता.

Advertisement
Advertisement

Leave a Reply