Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अर्र.. ग्राहकांना धक्का; RBI च्या ‘त्या’ घोषणेपूर्वीच ‘या’ 3 बड्या बँकांनी घेतला मोठा निर्णय

नवी दिल्ली –  आरबीआयचा (RBI) आर्थिक आढावा सुरू आहे. पण रिझर्व्ह बँकेच्या घोषणेपूर्वीच बँकांनी कर्ज महाग (व्याजदर वाढ) करायला सुरुवात केली आहे. म्हणजेच आता तुमच्यावर ईएमआयचाही (EMI) बोजा वाढणार आहे.

Advertisement

विशेष म्हणजे मे महिन्यात आरबीआय एमपीसीच्या बैठकीत रेपो रेट वाढवण्याच्या घोषणेनंतर सर्व बँकांनी एकामागून एक व्याजदर वाढवले. सध्या रिझर्व्ह बँकेची 3 दिवसीय बैठक सुरू आहे. या बैठकीनंतर रिझर्व्ह बँक रेपो दरात वाढ करण्याची घोषणा करू शकते, असे सांगण्यात येत आहे. या भीतीपोटी अनेक बँकांनी व्याजदर आणखी वाढवण्यास सुरुवात केली आहे.

Advertisement

रिझर्व्ह बँक बुधवारी या बैठकीच्या निकालाची माहिती देणार आहे, मात्र त्याआधी मंगळवारपासून तीन बँकांनी व्याजदरात वाढ केली आहे.

Advertisement

या बँकांनी व्याजदर वाढवले
सध्या 3 बँकांनी कर्जावरील व्याजदरात वाढ केली आहे. त्या कॅनरा बँक, HDFC बँक आणि करूर वैश्य बँक आहेत. कॅनरा बँकेने दिलेल्या माहितीनुसार, नवे व्याजदर 7 जूनपासून लागू होणार आहेत. याशिवाय कॅनरा बँकेने मार्जिन कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट (MCLR) 0.05 टक्क्यांनी वाढवले ​​आहे. करूर वैश्य बँकेने आपले बेंचमार्क प्राइम लेंडिंग रेट (BPLR) 0.40 टक्क्यांनी वाढवले ​​आहेत, तर HDFC ने देखील त्यांच्या MCLR मध्ये 0.35 टक्क्यांनी वाढ केली आहे.

Loading...
Advertisement

कर्ज किती वाढले
कॅनरा बँकेने दिलेल्या माहितीनुसार, बँकेने एका वर्षाच्या कर्जासाठी MCLR 0.05 टक्क्यांनी वाढवून 7.40 टक्के केला आहे, 6 महिन्यांसाठी हा दर 7.30 टक्क्यांवरून 7.35 टक्के केला आहे. दुसरीकडे, खाजगी क्षेत्रातील करूर वैश्य बँकेने बीपीएलआर 0.40 टक्क्यांनी वाढवून 13.75 टक्के केला आहे आणि आधार बिंदू 0.40 टक्क्यांनी वाढवून 8.75 टक्के केला आहे.

Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Advertisement

HDFC ने MCLR देखील वाढवला
मोठ्या खाजगी क्षेत्रातील बँक HDFC ने कर्जासाठीचा MCLR 7.15 टक्क्यांवरून 7.50 टक्के केला आहे. याअंतर्गत एका महिन्याच्या कर्जाचा व्याजदर 7.20 टक्क्यांवरून 7.55 टक्के करण्यात आला आहे. या वाढीनंतर, 3 महिन्यांच्या कर्जासाठी MCLR 7.60 टक्के आणि 6 महिन्यांच्या कर्जासाठी 7.70 टक्के करण्यात आला आहे. तर एका वर्षासाठी 7.85 टक्के दराने कर्ज मिळेल. त्याच वेळी, दोन वर्षांसाठी 7.95 टक्के आणि तीन वर्षांसाठी 8.05 टक्के दराने व्याज भरावे लागेल.

Advertisement

रेपो रेट वाढू शकतो
सोमवारपासून रिझव्‍‌र्ह बँकेचा 3 दिवसीय आर्थिक आढावा सुरू होत आहे. या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आरबीआयच्या या बैठकीत रेपो रेट 35 ते 40 बेसिस पॉईंटने वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply