Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

आम आदमी होणार हैराण..! महागाई आणखी वाढण्याची शक्यता; जाणून घ्या, नेमके काय घडलेय..

दिल्ली – वाढलेल्या महागाईतून दिलासा मिळण्याची शक्यता सध्या दिसत नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ (Increase Price In Crude Oil), रेपो दरात झालेली वाढ, गहू आणि इतर खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमती पाहता चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीपर्यंत महागाईचा त्रास कायम राहणार आहे. या दरम्यान केवळ पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणार नाहीत, तर आधीपेक्षा जास्त ईएमआय (EMI) भरावा लागेल. मात्र, सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी सरकार आणि आरबीआयने अनेक निर्णय घेतले आहेत.

Advertisement

आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीची (एमपीसी) तीन दिवसीय बैठक सोमवारपासून सुरू झाली आहे. त्याचे निर्णय बुधवारी येतील, ज्यामध्ये रेपो दर पुन्हा 0.35-0.40 टक्के जाहीर केला जाऊ शकतो. असे घडल्यास विविध प्रकारची कर्जे खर्चिक होतील. याचा परिणाम लोकांच्या मासिक हप्त्यावर (EMI) होईल. त्यांना आधीपेक्षा जास्त ईएमआय भरावा लागेल. तज्ज्ञांचे मत आहे, की एप्रिलमध्ये किरकोळ चलनवाढीचा दर 8 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे आणि घाऊक महागाई 13 महिन्यांसाठी दुहेरी आकड्यामध्ये राहिली आहे, आरबीआयकडे व्याजदर वाढविण्याचे मर्यादित पर्याय आहेत.

Advertisement

जगातील सर्वात मोठा तेल उत्पादक सौदी अरेबियाने आशियाई देशांसाठी कच्च्या तेलाच्या (Increase Price Crude Oil For Asian Countries) किमतीत ऐतिहासिक $6.50 ने वाढ केली आहे. यानंतर, ब्रेंट क्रूडच्या किमती जागतिक बाजारात 0.3% वाढून प्रति बॅरल $102.04 वर पोहोचल्या आहेत. यूएस बेंचमार्क WTI क्रूड 0.3% वाढून $119.27 प्रति बॅरल या तीन महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला. खरं तर, सौदी अरेबियाने आशियाई देशांसाठी क्रूड ऑइलच्या किंमतीत $6.50 ने वाढ केली आहे. त्यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती मे महिन्यानंतरच्या सर्वाधिक पातळीवर पोहोचल्या आहेत. भारत सौदी अरेबियाकडून 35-39% कच्च्या तेलाची खरेदी करत असल्याने किंमती वाढल्याचा परिणाम देशांतर्गत बाजारात दिसून येईल. ओपेक देशांनी जुलै आणि ऑगस्टसाठी तेलाचे उत्पादन (Increase Oil Production) दररोज 6.48 लाख बॅरलने वाढविण्याचे मान्य केले आहे. सध्या त्याचा किंमतीवर परिणाम झालेला दिसत नाही.

Loading...
Advertisement

भारताच्या निर्यातीवरील बंदी (Wheat Export Ban) आणि रशियाच्या आक्रमकतेनंतर युक्रेनमधील उत्पादनामुळे जागतिक बाजारपेठेत गव्हाच्या किमती वाढल्या आहेत, असे संयुक्त राष्ट्रांच्या अन्न संस्थेने म्हटले आहे. अन्न आणि कृषी संघटनेच्या (FAO) किंमत निर्देशांकाने मे 2022 मध्ये सरासरी 157.4 अंकांची नोंद केली, जी गेल्या वर्षातील मे महिन्याच्या तुलनेत 22.8% ने वाढली. जागतिक किमतीत वाढ झाल्याचा परिणाम देशांतर्गत बाजारावरही दिसून येईल.

Advertisement

पाकिस्तानात महागाईचा भडका.. नव्या सरकारने घेतला ‘हा’ धक्कादायक निर्णय; जाणून घ्या..

Advertisement
Advertisement

Leave a Reply