Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

जिओचा धमाकेदार प्लान..! फक्त 399 रुपयांत मिळणार ‘इतके’ फायदे; डेटाचे टेन्शन आता विसरा..

मुंबई – दिग्गज टेलिकॉम Jio ने Jio Entertainment on Demand पॅक सादर केला आहे. या श्रेणींतर्गत तीन प्लान सादर करण्यात आले आहेत. या प्लान्समध्ये नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ, डिस्ने + हॉटस्टार आणि जिओ टीव्हीचे फ्री सब्सक्रिप्शन (Free Subscription) दिले जात आहे. तसेच, या प्लानमध्ये जास्तीत जास्त 150GB डेटा ऑफर केला जातो.

Advertisement

जिओच्या 399 रुपयांच्या प्लॅनमध्ये एकूण 75 जीबी डेटा दिला जात आहे. तसेच 10 GB अतिरिक्त डेटा दिला जात आहे. याशिवाय 200GB डेटा रोलओव्हर (Data Rollover) सुविधा उपलब्ध आहे. हा डेटा प्लान आहे, जो चालू बिल सायकलपर्यंत वैध असतो. या प्लानमध्ये अमर्यादित कॉलसह (Unlimited Call) दररोज 100 एसएमएस उपलब्ध आहेत. हा प्लान Netflix, Amazon Prime, Disney+ Hotstar आणि Jio TV च्या मोफत सबस्क्रिप्शनसह येतो.

Advertisement

599 रुपयांचा प्लान

Advertisement

जिओने पोस्टपेड (Postpaid User Plan) युजर्ससाठी 599 रुपयांचा फॅमिली प्लान आणला आहे. त्यात अतिरिक्त सिम जोडले जाऊ शकते. या प्लानमध्ये अमर्यादित कॉलसह 100GB डेटा, दररोज 100SMS सुविधेसह 200GB डेटा रोलओव्हर सुविधा देण्यात येत आहे. या योजनेची वैधता (Plan Validity) सध्याच्या बिल सायकलनुसार असेल. या प्लानमध्येही नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम, डिस्ने + हॉटस्टार आणि जिओ टीव्हीचे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल.

Loading...
Advertisement

799 रुपयांचा प्लान

Advertisement

Jio च्या 799 रुपयांच्या प्लानमध्ये 150 GB डेटा दिला जात आहे. या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलबरोबरच दररोज 100 एसएमएस दिले जात आहेत. या प्लानमध्ये दोन अतिरिक्त सिम जोडले जाऊ शकतात. हा प्लान 200GB डेटा रोलओव्हर सुविधेसह येतो. या प्लानमध्ये, इतर दोन प्लानप्रमाणे, Netflix, Amazon Prime, Disney + Hotstar आणि Jio TV सारख्या 6 OTT अॅप मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध असेल.

Advertisement

Postpaid Plan : किंमत सारखीच पण तरीही जिओचा प्लान ठरलाय भारी; पहा, काय आहेत फायदे..

Advertisement
Advertisement

Leave a Reply