Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

1 जूनपासून बदलणार ‘हे’ 5 मोठे नियम; थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम, जाणुन घ्या नाहीतर..

दिल्ली – दोन दिवसांनी मे महिना संपून जून महिना सुरू होणार आहे. दरवेळेप्रमाणेच यंदाही नवीन महिना सुरू होताच काही छोटे-मोठे बदल पाहायला मिळतील. जून महिन्याच्या सुरुवातीला काही मोठे नियम बदलणार आहेत. ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल.

Advertisement

1 जूनपासून गोल्ड हॉलमार्किंग, एसबीआय होम लोन, अॅक्सिस बँकेचे बचत खाते नियम, मोटार विमा प्रीमियम आणि एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल होणार आहेत. पुढील महिन्यापासून या सर्व बदलांचा थेट परिणाम तुमच्या आयुष्यावर आणि तुमच्या खिशावर होईल. चला जाणून घेऊया एका तारखेपासून कोणती वस्तू महाग होईल.

Advertisement

SBI गृहकर्जाचे व्याज
देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने गृहकर्जासाठी एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेट (EBLR) वाढवला आहे. आता हा बेंचमार्क दर 0.40 टक्क्यांनी वाढून 7.05 टक्के झाला आहे. एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटनुसार वाढलेले व्याजदर 1 जूनपासून लागू होतील.

Advertisement

मोटार विमा प्रीमियम महाग होईल
1 जूनपासून तुमचा मोटार विम्याचा हप्ता महाग होईल. थर्ड पार्टी मोटर वाहन विम्याच्या प्रीमियममध्ये केंद्र सरकारने वाढ केली आहे. आता 1000 सीसी इंजिन क्षमतेच्या कारसाठी 2,094 रुपये विमा प्रीमियम भरावा लागेल. त्याच वेळी, 1,000 सीसी ते 1500 सीसी इंजिन असलेल्या कारसाठी विमा प्रीमियम 3221 रुपयांवरून 3416 रुपये करण्यात आला आहे.

Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Loading...
Advertisement

सोन्याचे हॉलमार्किंग
सोन्याच्या हॉलमार्किंगचा दुसरा टप्पा 1 जूनपासून लागू होणार आहे. आता 32 नवीन जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंग केंद्र उघडण्यात येणार आहेत. यापूर्वी 256 जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंग केंद्रे होती. आता 288 जिल्ह्यांमध्ये केवळ 20 ते 24 कॅरेटचे हॉलमार्क केलेले सोने विकले जाईल. आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याची विक्री करता येणार नाही.

Advertisement

अॅक्सिस बँक बचत खाते
अॅक्सिस बँकेने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का देत बचत खात्यांच्या सेवेवरील शुल्कात वाढ केली आहे. आता 1 जूनपासून बचत खात्यांच्या देखभालीसाठी आकारण्यात येणाऱ्या सेवा शुल्काचाही समावेश करण्यात आला आहे. याशिवाय अतिरिक्त चेकबुकवरही शुल्क आकारले जाईल.

Advertisement

गव्हाऐवजी तांदूळ मिळेल
1 जूनपासून गरिबांना मोफत रेशन अर्थात गव्हाचा कोटा कमी करण्यात आला आहे. उत्तर प्रदेश, बिहार आणि केरळला आता 1 जूनपासून 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळऐवजी 5 किलो तांदूळ देण्यात येणार आहे.

Advertisement

गॅस सिलेंडरची किंमत
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल होतो. आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या किमती वाढल्याचा परिणाम देशांतर्गत बाजारातही दिसून येतो.

Advertisement
Advertisement

Leave a Reply