Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

पेट्रोल-डिझेलच नवे दर जाहीर.. पेट्रोल भरण्याआधी जाणून घ्या, काय आहे इंधनाचे भाव..

मुंबई – तेल कंपन्यांनी शनिवारी (28 मे) सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर (Petrol Diesel New Price) जाहीर केले आहेत. आज पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लीटर विकले जात आहे. त्याच वेळी, पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये लिटर आहे. सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत केंद्र सरकारने मागील शनिवारी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात (Excise Duty) अनुक्रमे 8 रुपये आणि 6 रुपयांनी कपात करण्याची घोषणा केली, जेणेकरून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होतील.

Advertisement

आज राजधानी दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर आहे. कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे. लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर आहे. पाटण्यात पेट्रोल 107.24 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.04 रुपये आहे. भोपाळमध्ये पेट्रोल 108.65 रुपये आणि डिझेल 93.90 रुपये प्रति लिटर आहे. पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर दराने विक्री होत आहे.

Advertisement

याआधी सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत मोदी सरकारने शनिवारी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात (Excise Duty) अनुक्रमे 8 रुपये आणि 7 रुपये प्रति लिटर कपात करण्याची घोषणा केली होती. जेणेकरून पेट्रोलच्या किंमती आणि डिझेल कमी झाल्या आहेत. केंद्र सरकारने दिलासा दिल्यानंतर महाराष्ट्र, राजस्थान आणि केरळने पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅटमध्ये (Reduce In Vat) कपात केली आहे. महाराष्ट्राने पेट्रोलवरील व्हॅट 2.08 रुपयांनी आणि डिझेलवर 1.44 रुपये, राजस्थानने पेट्रोलवर 2.48 रुपये आणि डिझेलवर 1.16 रुपये कर कमी केला आहे. तर केरळने पेट्रोलवर 2.41 रुपये आणि डिझेलवर 1.36 रुपयांची कपात केली आहे.

Loading...
Advertisement

सध्या भाजप किंवा भाजप समर्थित राज्ये आणि बिगरभाजप सरकारे असलेल्या राज्यांमध्ये म्हणजेच जिथे आप, काँग्रेस किंवा इतर कोणत्याही पक्षाचे सरकार आहे तिथे पेट्रोल-डिझेल तुलनेने महाग (Fuel Costly In Non BJP Ruled State) आहे.

Advertisement

भाजपशासित राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेल स्वस्त.. पहा, ‘येथे’ सरकारांनी किती दर कमी केलेत..

Advertisement
Advertisement

Leave a Reply