Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

युद्धाचा इफेक्ट..! श्रीलका-पाकिस्ताननंतर ‘या’ लहान देशात पडलाय खाद्यपदार्थांचा दुष्काळ; जाणून घ्या..

दिल्ली – श्रीलंका, पाकिस्ताननंतर आता भारताचा आणखी एक शेजारी देश असलेल्या भूतानमध्ये (Bhutan) अन्नपदार्थांची प्रचंड कमतरता निर्माण झाली आहे. विशेषत: भूतानच्या ग्रामीण भागात लोकांना खाद्यपदार्थांच्या दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. भूतानचे अर्थमंत्री लोकनाथ शर्मा यांनी गुरुवारी याबाबतची माहिती रॉयटर्स या वृत्तसंस्थेला दिली.

Advertisement

भूतानची लोकसंख्या 8 लाखांपेक्षा कमी आहे. परंतु रशिया-युक्रेन युद्धामुळे (Russia Ukraine War) हा छोटा देश अडचणीत आहे. तीन महिन्यांहून अधिक काळ सुरू असलेल्या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या (Crude Oil Price) आणि धान्यांच्या जागतिक किमती गगनाला भिडल्या आहेत. कोरोना महामारीचा (Corona Virus) फटका बसल्यानंतर पुन्हा सावरण्याच्या मार्गावर आलेल्या भूतानच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला आहे. अन्नपदार्थांची देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी भारतावर अवलंबून असलेल्या शेजारील देशांपैकी भूतान एक आहे. भूतानने गेल्या वर्षी भारताकडून $30.35 दशलक्ष किमतीचे अन्नधान्य खरेदी केले. भूतान प्रामुख्याने भारताकडून तांदूळ (Rice) आणि गहू (Wheat) खरेदी करतो. भारत आणि भूतानमधील द्विपक्षीय संबंध अतिशय सौहार्दपूर्ण राहिले आहेत. त्यामुळे भारत भुतानला प्रत्येक वेळी मदत करत आला आहे.

Advertisement

दरम्यान, श्रीलंकेची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. देशात हिंसाचार (Violence) आणि जाळपोळीच्या घटना सातत्याने घडत आहेत. सरकार आणि अयोग्य धोरणांमुळे देशाच्या बिघडलेल्या स्थितीविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांनी अनेक नेत्यांसह पंतप्रधानांचे घर जाळले. श्रीलंकेसाठी या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग सध्या दिसत नाही. श्रीलंकेवर तब्बल 56 अब्ज डॉलरचे बाह्य कर्ज (56 Billion Dollar Foreign Debt) आहे. त्यातील दहा टक्के कर्ज एकट्या चीनचे आहे. त्याच्यासाठी ही रक्कम इतकी मोठी आहे की ती परत करण्याचा कोणताही मार्ग दिसत नाही. या कर्जावर श्रीलंकेला दोन अब्ज डॉलर्स फक्त व्याजाच्या (Interest On Loan) स्वरूपात द्यावे लागतील.

Loading...
Advertisement

या परिस्थितीसाठी श्रीलंकेचे तज्ज्ञ तेथील सरकारला जबाबदार धरत आहेत. मात्र या परिस्थितीचा सर्वाधिक वाईट परिणाम तेथील सर्वसामान्य जनतेवर होत (Effect On Common Citizen) असल्याचेही वास्तव आहे. देशात अन्नधान्याची तीव्र टंचाई (Shortage Of Food) आहे. याशिवाय औषधांचीही (Medicines) मोठी कमतरता आहे. जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. परकीय कर्जाच्या परतफेडीचा विचार केला तर श्रीलंकेकडे 50 अब्ज डॉलर्सचा परकीय चलन साठा (Foreign Reserve) उरला नाही. अशा परिस्थितीत जुलैमध्ये विविध वित्तीय संस्था श्रीलंकेला डिफॉल्टर (Defaulter) म्हणून घोषित करण्याची दाट शक्यता आहे.

Advertisement

रशियाने पश्चिमी देशांना धमकावले..! म्हणाला, ‘तसे’ करणे कुणालाच शक्य नाही; जाणून घ्या..

Advertisement

चिन्यांचा खतरनाक खेळ..! फक्त श्रीलंकाच नाही तर तब्बल ‘इतके’ देश अडकलेत ‘त्या’ सापळ्यात..

Advertisement
Advertisement

Leave a Reply