Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

पाकिस्तानात महागाईचा भडका.. नव्या सरकारने घेतला ‘हा’ धक्कादायक निर्णय; जाणून घ्या..

दिल्ली – पाकिस्तानला महागाईचा जबरदस्त तडाखा बसला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अचानक 30 रुपयांनी वाढ (Fuel Price Increase In Pakistan) करण्यात आली आहे. भारताचे कौतुक करत माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी शाहबाज शरीफ (Shahbaz Sharif) यांच्या सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारवर टीका करताना इम्रान खान म्हणाले की, या असंवेदनशील सरकारने पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाने रशियाबरोबर (Russia) 30 टक्के स्वस्त तेलासाठी केलेला करार पुढे नेला नाही. त्यांनी भारताचे कौतुक केले आणि सांगितले की अमेरिकेचा सामरिक मित्र रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करून इंधनाच्या किमती प्रति लिटर 25 रुपये (पाकिस्तानी रुपये) कमी करू शकला आहे.

Advertisement

इम्रान खान यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 20 टक्के म्हणजेच प्रति लीटर 30 रुपयांनी वाढवून देश परदेशी मालकांसमोर सरकारच्या अधीनतेची किंमत मोजू लागला आहे. इतिहासातील एक सर्वोच्च दरवाढ आहे. अक्षम आणि असंवेदनशील सरकारने 30 टक्के स्वस्त तेल विकत घेणारा रशियाबरोबरचा आमचा करार पुढे केला नाही. ते पुढे म्हणाले, की “याउलट, अमेरिकेचा (America) सामरिक मित्र असलेल्या भारताने (India) रशियाकडून स्वस्त तेल विकत घेऊन इंधनाचे दर प्रतिलिटर 25 रुपये (Pakistani Currency) कमी केले आहेत.

Loading...
Advertisement

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कार्यक्रमाचे पुनरुज्जीवन सुनिश्चित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगत पाकिस्तानने गुरुवारी पेट्रोलियम उत्पादनांच्या (Petroleum Product) किमती प्रति लिटर 30 रुपयांनी वाढ केल्या. पेट्रोलची किंमत 179.86 रुपये, डिझेलची किंमत 174.15 रुपये आणि केरोसीन तेलाची किंमत 155.56 रुपये प्रति लीटर असल्याची माहिती डॉन वृत्तपत्राने दिली आहे. त्याच वेळी, लाइट डिझेलची किंमत प्रति लिटर 148.31 रुपये असेल. पाकिस्तानचे अर्थमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. ते म्हणाले की, सरकारकडे दरवाढ करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आम्ही अजूनही डिझेलवर प्रतिलिटर 56 रुपये तोटा सहन करत आहोत.

Advertisement

श्रीलंकेच्या वाटेवर पाकिस्तान..! देशाची आर्थिक परिस्थिती अत्यंत खराब; तज्ज्ञांनी दिलाय ‘हा’ इशारा..

Advertisement
Advertisement

Leave a Reply