Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

युद्धाचे चटके..! फक्त तीन महिन्यात युक्रेनचे 9740 कोटी डॉलरचे नुकसान.. पहा, काय म्हणतोय अहवाल..

दिल्ली – युद्धात नेहमीच फायदा कमी आणि नुकसान जास्त होते. मग ते कोणतेही युद्ध असो. आता हेच पहा ना मागील तीन महिन्यांपासून युक्रेन आणि रशियात युद्ध सुरू (Russia Ukraine War) आहे. या युद्धात युक्रेनचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच या युद्धाचा फटका रशियालाही बसला आहेच. रशिया-युक्रेन युद्धाला 90 दिवस उलटले आहेत. कीव स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (KSE) च्या मते, 90 दिवसांच्या युद्धात युक्रेनियन मालमत्तेचे (Ukrainian Property Damage) एकूण 9 हजार 740 कोटी डॉलर इतके प्रचंड नुकसान झाले आहे.

Advertisement

गेल्या एका आठवड्यात युक्रेनला रशियन लष्करी कारवाईत एकूण 310 कोटी डॉलरचा फटका बसला आहे. KSE च्या मते, रशियन कारवाईत आतापर्यंत एकूण 1067 शैक्षणिक संस्था (Educational Organisation) नष्ट झाल्या आहेत. त्यानुसार शैक्षणिक संस्थांचे एकूण 150 अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. अहवालानुसार, या 90 दिवसांच्या युद्धादरम्यान, युक्रेनमधील सरासरी 12 शैक्षणिक संस्था दररोज कमी झाल्या आहेत. त्याचबरोबर 574 आरोग्य केंद्रेही (Health Centre) युद्धात उद्ध्वस्त झाली आहेत. युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी दावा केला आहे, की युद्धात एकूण 1873 शैक्षणिक संस्थांचे नुकसान झाले आहे.

Advertisement

युक्रेन सरकारने (Ukraine Government) जारी केलेल्या अहवालानुसार तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धात 234 मुलांचा मृत्यू झाला आहे. डेटाच्या विश्लेषणावरून असे दिसून आले आहे, की युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यापासून दररोज सरासरी तीन मुलांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर 433 हून अधिक मुले जखमी झाली आहेत.

Loading...
Advertisement

रशियन बॉम्बहल्ल्यात आतापर्यंत 12 विमानतळ, 295 पूल, 169 गोदामे, 19 मॉल आणि 179 सांस्कृतिक केंद्रे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. याशिवाय रशियन कारवाईत 169 गोदामे आणि 28 तेल डेपोचेही पूर्णपणे नुकसान झाले आहे. युक्रेनियन लष्कराच्या जनरल स्टाफने दावा केला आहे की युक्रेनने 24 मे पर्यंत 29,350 रशियन सैनिक मारले आहेत. युक्रेनियन सैन्याने 1302 रशियन रणगाडे नष्ट केले. त्याच वेळी, 606 तोफखाना यंत्रणा, 93 विमानविरोधी यंत्रणा आणि 205 विमाने नष्ट करण्यात आली आहेत.

Advertisement

Ukraine War : युक्रेनच्या अध्यक्षांचे जागतिक नेत्यांना आवाहन; सांगितला रशियाला अडचणीत आणण्याचा प्लान..

Advertisement

 

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply