Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

खाद्यतेलावर दिलासा: आता स्वस्तात मिळणार साखर?; सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

दिल्ली – महागाईत सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारच्या (central government) वतीने प्रयत्न केले जात आहेत. पेट्रोल-डिझेल (Petrol And Diesel), खाद्यतेल (Oil) आणि गव्हानंतर(Wheat)  आता साखरेबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातल्यानंतर सरकारने 1 जूनपासून साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. देशांतर्गत बाजारपेठेत साखरेची (Sugar) उपलब्धता वाढवणे आणि भाववाढ रोखणे हा त्याचा उद्देश आहे.

Advertisement

तेल आयातीवरील कस्टम ड्युटी रद्द केली
साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्याची माहिती ग्राहक व्यवहार मंत्रालयाने दिली. यापूर्वी सूर्यफूल आणि सोयाबीन तेलाच्या आयातीवरील कस्टम ड्युटी सरकारने रद्द केली होती. या निर्णयाचा फटका थेट खाद्यतेलाच्या किमतीवर बसणार आहे. डायरेक्टरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेड (DGFT) ने एका अधिसूचनेत म्हटले आहे की, ‘साखर (कच्ची, शुद्ध आणि पांढरी साखर) निर्यात 1 जून 2022 पासून प्रतिबंधित श्रेणीत ठेवण्यात आली आहे.’

Advertisement

साखर ठराविक प्रमाणात निर्यात केली जाईल
सीएक्सएल आणि टीआरक्यू अंतर्गत युरोपियन युनियन आणि यूएसमध्ये निर्यात केल्या जाणाऱ्या साखरेवर हे निर्बंध लागू होणार नाहीत, असेही या अधिसूचनेत सांगण्यात आले आहे. या प्रदेशांमध्ये सीएक्सएल आणि टीआरक्यू अंतर्गत काही प्रमाणात साखर निर्यात केली जाते.

Loading...
Advertisement

100 एमएलटी साखर निर्यातीस परवानगी
साखर हंगाम 2021-22 (ऑक्टोबर-सप्टेंबर) दरम्यान देशातील साखरेची देशांतर्गत उपलब्धता आणि किंमत स्थिरता राखण्यासाठी 1 जूनपासून साखर निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला, असे निवेदनात म्हटले आहे. साखर हंगामात देशांतर्गत उपलब्धता आणि किंमत स्थिरता राखण्यासाठी, 100 LMT (लाख मेट्रिक टन) पर्यंत साखर निर्यातीस परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Advertisement

डीजीएफटीने जारी केलेल्या आदेशानुसार, 1 जून 2022 ते 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत, यापैकी जे आधी असेल, साखर संचालनालय, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या विशिष्ट परवानगीने साखरेच्या निर्यातीला परवानगी दिली जाईल.

Advertisement
Advertisement

Leave a Reply