कार-दुचाकीबाबत खुशखबर..! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली मोठी घोषणा; जाणून घ्या..
मुंबई – तुम्हीही इलेक्ट्रिक कार-दुचाकी घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी आता इलेक्ट्रिक कार-दुचाकीची किंमत आता पेट्रोल वाहनांपेक्षा (Petrol Vehicle) स्वस्त होणार असल्याचे संकेत दिले आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, तंत्रज्ञान आणि हरित इंधनातील जलद प्रगतीमुळे इलेक्ट्रिक ऑटोमोबाईलची किंमत कमी होईल. म्हणजेच याचा फायदा सर्वसामान्यांना होणार आहे. इतकेच नाही तर इलेक्ट्रिक वाहनांवर अनुदानाची (Subsidy On Electric Vehicles) तरतूदही सरकार करणार आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण सरकारनेही तसे संकेत दिले आहेत. अनेक राज्यांत अनुदानही सुरू झाले आहे.
अलीकडेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्ग मंत्रालयाच्या 2022-23 च्या अनुदानाच्या मागणीवर लोकसभेत उत्तर देताना सांगितले होते की, प्रभावी स्वदेशी इंधनाकडे जाण्याची गरज आहे. इलेक्ट्रिक इंधन लवकरच प्रत्यक्षात येईल. त्यामुळे प्रदूषणाची पातळी कमी (Pollution Level) होईल. प्रदूषण हे केवळ भारतासमोरच नाही तर जगभर एक मोठे आव्हान आहे. याबरोबरच खासदारांना हायड्रोजन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहनही करण्यात आले. त्यांनी खासदारांना आपापल्या भागातील वाया जाणाऱ्या पाण्याचे ग्रीन हायड्रोजनमध्ये बदलण्यासाठी पुढाकार घेण्यास सांगितले. हरित इंधन ही भविष्यातील ऊर्जा असेल, असे ते म्हणाले.
इतकेच नाही तर इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स आणि FY21 AGM च्या वार्षिक सत्रात गडकरी म्हणाले, की “दोन वर्षांत, इलेक्ट्रिक वाहनांची किंमत अशा पातळीपर्यंत खाली येईल जी त्यांच्या पेट्रोल वाहनांच्या बरोबरीने असेल. सुविधांचा विस्तार करण्याचे काम सरकार करत आहे. गडकरी पुढे म्हणाले, की “आम्ही 2023 पर्यंत प्रमुख महामार्गांवर 600 ईव्ही चार्जिंग पॉइंट्स (Charging Point) उभारणार आहोत.
इलेक्ट्रिक स्कूटरबाबत धक्कादायक निर्णय, ग्राहकांना बसणार ‘जोर का झटका’..!