Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

श्रीलंकेच्या राष्ट्रपतींचा मोठा निर्णय.. देशातील परिस्थिती सुधारण्यासाठी केली घोषणा; जाणून घ्या..

दिल्ली – श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे (Gotabaya Rajapaksa) यांनी जवळपास दोन आठवड्यांनंतर देशातील आणीबाणी उठवण्याची घोषणा केली आहे. सरकारच्या विरोधात प्रचंड निदर्शने झाल्यामुळे, राष्ट्रपती गोटाबाया यांनी 6 मे रोजी आणीबाणीची घोषणा केली होती. हिरू न्यूजनुसार, राष्ट्रपती सचिवालयाने सांगितले की, शुक्रवारी मध्यरात्रीपासून देशातील आणीबाणी (Emergency In Sri Lanka) हटवण्यात आली आहे. देशातील कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे मानले जात आहे. आणीबाणीच्या काळात पोलिसांना आणि सुरक्षा दलांना मनमानी पद्धतीने लोकांना अटक करण्याचे आणि ताब्यात घेण्याचे अधिकार होते.

Advertisement

खरेतर, श्रीलंकेतील मोठी लोकसंख्या प्रचंड आर्थिक संकटामागे (Financial Crisis In Sri Lanka) राजपक्षे कुटुंबाला जबाबदार मानत आहे. त्यामुळेच राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी करत लोक रस्त्यावर उतरले आणि प्रचंड हिंसाचार झाला. यामुळे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी देशात आणीबाणी लागू करण्याची घोषणा केली. पंतप्रधान महिंदा राजपक्षे (Mahinda Rajapaksa) यांच्या राजीनाम्यानंतर देशात सरकार समर्थक आणि सरकारविरोधी निदर्शकांमध्ये झालेल्या संघर्षात नऊ जण ठार झाले आणि 200 हून अधिक जखमी झाले.

Advertisement

1948 मध्ये ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर श्रीलंकेला सर्वात वाईट आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. हे संकट अंशतः परकीय चलनाच्या (Foreign Reserve) कमतरतेमुळे आहे. याचा अर्थ देश अन्न आणि इंधनाच्या आयातीसाठी (Food And Fuel Import) पैसे देऊ शकत नाही. श्रीलंकेत चलनवाढीचा दर 40 टक्क्यांवर पोहोचणार आहे. अन्न, इंधन, औषधे याशिवाय वीज संकटामुळे नागरिक संतापले असून सरकारच्या विरोधात जोरदार आंदोलने होत आहेत.

Loading...
Advertisement

चिन्यांचा खतरनाक खेळ..! फक्त श्रीलंकाच नाही तर तब्बल ‘इतके’ देश अडकलेत ‘त्या’ सापळ्यात..

Advertisement

चीनच्या कृपेने श्रीलंका बेहाल..! पहा काय वाईट स्थिती झालीय शेजारी देशाची

Advertisement
Advertisement

Leave a Reply