Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

पेट्रोल-डिझेलनंतर ‘या’ वस्तूंच्याही किंमती घटल्या.. केंद्र सरकारने घेतला आणखी एक निर्णय..

दिल्ली – पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क (Excise Duty) कमी करण्याबरोबरच मोदी सरकारने आणखी एक मोठा दिलासा दिला आहे. पोलाद उद्योगाद्वारे वापरल्या जाणार्‍या कोकिंग कोळसा (Coal Price) आणि फेरोनिकल्ससह काही कच्च्या मालाच्या आयातीवरील सीमा शुल्क सरकारने माफ केले आहे. देशांतर्गत उद्योगासाठी लागणारा खर्च कमी करून किमती खाली आणण्यासाठी हा निर्णय सरकारने घेतला आहे. एका अधिसूचनेनुसार, देशांतर्गत उपलब्धता वाढवण्यासाठी लोह खनिजाच्या निर्यातीवरील शुल्क 50 टक्के आणि काही स्टील इंटरमीडिएट्सवर 15 टक्के करण्यात आले आहे. हा बदल आजपासून म्हणजेच रविवारपासून लागू झाला आहे.

Advertisement

फेरोनिकल, कोकिंग कोळसा, पीसीआय कोळशावरील आयात शुल्क 2.5 टक्क्यांवरून कमी करण्यात आले आहे. नॅफ्थावरील आयात शुल्क 2.5 टक्क्यांवरून 1 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहे, तर प्रोपीलीन ऑक्साईडवरील शुल्क निम्म्यावरून 2.5 टक्के करण्यात आले आहे. विनाइल क्लोराइड (PVC) च्या पॉलिमरवरील आयात शुल्क सध्याच्या 10 टक्क्यांवरून 7.5 टक्के करण्यात आले आहे.

Advertisement

प्लॅस्टिकवरील (Plastic) सीमाशुल्कात कपातीची घोषणा करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, आयातीवर अवलंबून असलेल्या कच्चा माल आणि मध्यस्थांवर शुल्क कमी केले जात आहे. यामुळे उत्पादनांची किंमत कमी होईल. एएमआरजी अँड असोसिएट्सचे वरिष्ठ भागीदार रजत मोहन म्हणाले की, या उत्पादनांवरील आयात शुल्कात मोठी कपात केल्याने महागाई कमी होण्यास मदत होईल.

Loading...
Advertisement

याआधी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात अनुक्रमे 9.5 रुपये व 7 रुपये कपात केली. त्यामुळे पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price reduced) कमी होणार आहेत. वाढती महागाई (Inflation) लक्षात घेता शनिवारी केंद्र सरकारने हा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर राजस्थान सरकारनेही इंधनावरील व्हॅट (VAT) कमी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. बाकीच्या राज्यांनी मात्र अद्याप कर कमी करण्याचा निर्णय घेतलेला नाही.

Advertisement

पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर..जाणून घ्या, तुमच्या शहरातील पेट्रोलचे दर..

Advertisement

मोदी सरकारच्या ‘त्या’ निर्णयाचे पाकिस्ताननेही केले कौतुक; पहा, काय म्हणतोय शेजारी देश..

Advertisement
Advertisement

Leave a Reply