Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

मोदी सरकारच्या ‘त्या’ निर्णयाचे पाकिस्ताननेही केले कौतुक; पहा, काय म्हणतोय शेजारी देश..

दिल्ली – अमेरिकेच्या दबावाला न घाबरता रशियाकडून अनुदानित तेल खरेदी केल्याबद्दल पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी पुन्हा एकदा भारताचे कौतुक केले आहे. ते म्हणाले की, त्यांचे सरकार स्वतंत्र परराष्ट्र धोरणाच्या मदतीने हे साध्य करण्यासाठी काम करत आहे. त्यांनी या मुद्द्यावर पाकिस्तानच्या नव्या सरकारवर मात्र जोरदार टीका केली. मोदी सरकारने काल केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याच्या घोषणेचेही खान यांनी कौतुक केले.

Advertisement

इंधन दरात कपात करण्याच्या भारत सरकारच्या निर्णयाची माहिती देताना, माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले, की “क्वाडचा एक भाग असूनही भारताने स्वतःला अमेरिकेच्या (America) दबावापासून अलिप्त ठेवले आणि जनतेला दिलासा देण्याच्या उद्देशाने रशियाकडून (Russia) सवलतीच्या दरात तेल खरेदी केले. स्वतंत्र परराष्ट्र धोरणाच्या मदतीने आमचे सरकार जे साध्य करण्यासाठी काम करत होते ते भारताने केले.

Loading...
Advertisement

केंद्र सरकारने इंधनावरील उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर शनिवारी पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 9.5 रुपये आणि डिझेलच्या दरात 7 रुपयांनी कपात करण्यात आली. युक्रेनवर (Ukraine) आक्रमण केल्यापासून पाश्चात्य देशांनी रशियावर कठोर निर्बंध लादले असून, अनेक तेल आयातदारांना रशियाबरोबर व्यापार करणे बंद करण्यास भाग पाडले आहे. अशा वेळी भारताची रशियन तेलाची (Russian Oil Import) आयात वाढली आहे. रॉयटर्सच्या अहवालानुसार, भारताने महागाईचा सामना करण्यासाठी रशियाकडून अनुदानित तेलाची खरेदी वाढवली आणि एप्रिलमध्ये देशातील कच्च्या तेलाची (Crude Oil Import) आयात साडेतीन वर्षांच्या उच्चांकावर नेली. इम्रान खान म्हणाले, की त्यांच्या सरकारला लोकांना दिलासा देण्यासाठी अशीच कारवाई करायची होती. परंतु, तसे घडले नाही. आमच्या सरकारसाठी पाकिस्तानचे हित महत्वाचे होते. मात्र, तसे घडले नाही.

Advertisement

कंगाल पाकिस्तानने भारताबाबत घेतला महत्वाचा निर्णय.. पहा, काय आहे नव्या सरकारचा प्लान..

Advertisement
Advertisement

Leave a Reply