Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

फक्त सहाच दिवसात दुसरा झटका.. ‘या’ इंधनाच्या किंमती पु्न्हा वाढल्या; जाणून घ्या, अपडेट..

दिल्ली – महागाईच्या आघाडीवर सर्वसामान्यांना पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे. सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ (CNG Price increase) करण्यात आली आहे. इंद्रप्रस्थ गॅसने दिल्लीत सीएनजीच्या किमती 2 रुपयांनी वाढवल्या आहेत. नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादसाठी सीएनजीची किंमत 78.17 रुपये प्रति किलो झाली आहे. त्याच वेळी, गुरुग्राममध्ये त्याची किंमत आता 83.94 रुपये प्रति किलो असेल. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडच्या म्हणण्यानुसार, आज सकाळी 6 वाजल्यापासून दिल्ली-एनसीआरसह शहरांच्या सीएनजी दरात बदल करण्यात आला आहे.

Advertisement

त्याचवेळी मुझफ्फरनगर, मेरठ आणि शामलीमध्ये सीएनजी गॅसची किंमत 82.84 रुपये प्रति किलो झाली आहे. रेवाडीत सीएनजी गॅसची किंमत 86.07 रुपये प्रति किलो झाली आहे. याआधी 15 मे रोजी सीएनजीच्या किमती वाढवण्यात आल्या होत्या. आंतरराष्ट्रीय बाजारात नैसर्गिक वायूच्या (Natural Gas) किमती प्रचंड वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत देशांतर्गत किमती आणखी वाढू शकतात. नजीकच्या काळात गॅसच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.

Loading...
Advertisement

पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Price) आजही तेच आहेत. आज सलग 44 वा दिवस असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. म्हणजेच आज पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींपासून जनतेला सध्या मोठा दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे एलपीजी गॅस (LPG Gas) सिलिंडरसह जीवनावश्यक वस्तूंच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्याचा मोठा त्रास सर्वसामान्यांना होत आहे. सगळीकडे सध्या वाढलेल्या महागाईचीच (Inflation) चर्चा सुरू आहे.  महागाई वाढल्याने सामान्य नागरिक हैराण झाले आहेत. महागाई कमी करण्यासाठी सरकारकडून मात्र कोणतेच प्रयत्न होताना दिसत नाहीत. विरोधी पक्षांकडूनही या मुद्द्यावर तितक्या जोरदारपणे विरोध होताना दिसत नाही. महागाई वाढत असताना त्यामागची कारणे मात्र सर्वसामान्यांना अजूनही ठाऊक नाहीत.

Advertisement

महागाईचे संकट वाढले..! ‘त्यासाठी’ कंपन्यांनी केली ‘ही’ भन्नाट आयडीया.. पहा, काय होणार परिणाम..

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply