Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर..जाणून घ्या, तुमच्या शहरातील पेट्रोलचे दर..

मुंबई – तेल विपणन कंपन्या IOC, HPCL आणि BPCL ने पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. पेट्रोल आणि डिझेलबाबत आज म्हणजेच शुक्रवारीही दिलासा मिळाला आहे. सलग 43 व्या दिवशी कोणताही बदल झालेला नाही. देशातील एकूण मागणीच्या 85 टक्के तेल (Crude Oil) आयात केले जाते आणि त्यामुळे किरकोळ इंधनाच्या किमती नेहमी बदलत असतात. त्याच वेळी, आजही देशातील सर्वात खर्चिक पेट्रोल परभणी येथे 123.47 रुपये प्रति लिटर आहे, आंध्र प्रदेशमध्ये डिझेल 107.68 रुपये प्रति लिटर आहे, तर सर्वात स्वस्त पेट्रोल पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 91.45 रुपये आणि डिझेल 85.83 रुपये आहे.

Advertisement

राजधानी दिल्लीत पेट्रोलची सध्याची किंमत (Petrol Price in Delhi) 105.41 रुपये प्रति लिटर आहे. शेजारील देशांमध्ये मात्र पेट्रोल खूप स्वस्त आहे. बांगलादेशात (Bangladesh) पेट्रोलची किंमत प्रति लिटर 1.05 डॉलर, पाकिस्तानमध्ये (Pakistan) 77 सेंट आणि श्रीलंकेत (Sri Lanka) 67 सेंट प्रति लिटर आहे. पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोलची किंमत 91.45 रुपये आहे, तर डिझेलची किंमत 85.83 रुपये प्रति लीटर आहे. राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये पेट्रोलचा दर 122.93 रुपये आणि डिझेलचा दर 105.34 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत पेट्रोलचा दर रु.120.51 आणि डिझेल रु.104.77 लिटर आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये (Bhopal) पेट्रोलचा दर 118.14 रुपये तर डिझेलचा दर 101.16 रुपये प्रति लिटर आहे. राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये पेट्रोल प्रतिलिटर 118.03 रुपये आणि डिझेल 100.92 रुपये दराने विकले जात आहे. झारखंडची राजधानी रांचीमध्ये एक लिटर पेट्रोलसाठी 108.71 रुपये आणि डिझेलसाठी 102.02 रुपये खर्च होत आहे.

Advertisement

बिहारची राजधानी पटनामध्ये पेट्रोल 116.23 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 101.06 रुपयांना विकले जात आहे. चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 110.85 रुपये आणि डिझेलची किंमत 100.94 रुपये आहे. बंगळुरूमध्ये पेट्रोल 111.09 रुपये प्रति लीटर, तर डिझेल 94.79 रुपये दराने विकले जात आहे. कोलकात्यात पेट्रोल 115.12 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 99.83 रुपये दराने विकले जात आहे. दिल्लीत आज पेट्रोल 105.41 रुपये आणि डिझेल 96.67 रुपये आहे. अहमदाबादमध्ये आज पेट्रोल 105.08 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 99.43 रुपये दराने विकले जात आहे. चंदीगडमध्ये पेट्रोलची किंमत 104.74 रुपये प्रति लीटर आहे आणि डिझेल आज 90.83 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. आग्रामध्ये पेट्रोल 105.03 रुपये आणि डिझेल 96.58 रुपये प्रति लिटर आहे. लखनौमध्ये पेट्रोल 105.25 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 96.83 रुपये प्रति लिटर आहे.

Loading...
Advertisement

137 दिवसांच्या स्थिरतेनंतर 22 मार्चपासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती (Petrol Diesel Price) वाढण्यास सुरुवात झाली. कंपन्यांनी 45 दिवसांत 14 वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली. या दरम्यान त्यांच्या दरात प्रतिलिटर सुमारे 10 रुपयांनी वाढ झाली आहे.

Advertisement

पेट्रोल-डिझेलने दिला दिलासा पण, ‘या’ इंधनाने दिल्लीकरांना दिला झटका; जाणून तुमच्या शहरातील पेट्रोलचे नवे दर..

Advertisement
Advertisement

Leave a Reply