Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

हवामानाचा इफेक्ट..! देशात गव्हाच्या बाबतीत घडलाय ‘हा’ प्रकार; वाचा महत्वाची माहिती..

दिल्ली – कृषी मंत्रालयाने गुरूवारी सांगितले की, यावर्षी गव्हाचे उत्पादन सुमारे 3 टक्क्यांनी ने कमी होऊन 106 दशलक्ष टन होईल. भारताच्या गव्हाच्या उत्पादनात (Wheat Production) 2014-15 नंतर पहिल्यांदाच घट झाली आहे. सरकारने सांगितले की, उत्पादनात घट झाल्याचे कारण असामान्यपणे उष्ण हवामान (Increase In Temperature) आहे. पीक वर्ष 2020-21 मध्ये गव्हाचे उत्पादन विक्रमी 109 दशलक्ष टन होते.

Advertisement

फेब्रुवारीमध्ये सरकारने 111 दशलक्ष टनांहून अधिक गव्हाचे विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त केला होता. काही दिवसांपूर्वी अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी पत्रकारांना सांगितले होते, की उन्हाळा सुरू झाल्याने उत्पादन 105 दशलक्ष टनांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. गेल्या वेळी गव्हाच्या उत्पादनात घट झाल्याची नोंद दुष्काळामुळे झाली होती.

Advertisement

भारत आणि इतर काही देशांमध्ये कमी उत्पादन आणि युक्रेन युद्धामुळे (Ukraine War) अन्नधान्याचा जागतिक पुरवठा संकटात आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी भारताने अलीकडेच गव्हाच्या निर्यातीवर बंदी (Wheat Export Ban) घातली होती. या सर्व कारणांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर गव्हाचे भाव गगनाला भिडले आहेत. तथापि, केंद्राने असे म्हटले आहे की देशात पुरेसा साठा आहे, जो देशांतर्गत गरज भागविण्यासाठी बफरच्या गरजेपेक्षा कितीतरी जास्त आहे.

Loading...
Advertisement

सरकारने म्हटले आहे, की गव्हाच्या उत्पादनात घट झाल्यामुळे एकूण अन्नधान्य उत्पादनावर परिणाम झाला नाही, जो अद्याप 314 दशलक्ष टनांच्या सर्वकालीन उच्चांकावर जाईल, जो 2020-21 पीक वर्षाच्या तुलनेत 1% जास्त आहे. यामुळे चालू पीक वर्षात भात, मका आणि कडधान्ये यासारख्या प्रमुख पिकांचे विक्रमी उत्पादन होण्यास मदत झाली आहे. मंत्रालयाने गुरुवारी 2021-22 या पीक वर्षासाठी अन्नधान्य, तेलबिया, ऊस, कापूस आणि ताग यांच्या उत्पादनाचा तिसरा अंदाज जाहीर केला. तिसरा अंदाज सहसा अंतिम आकड्यांइतका असतो जो नंतर जाहीर केला जाईल.

Advertisement

Wheat Export Ban: गहू बनलेय जागतिक हत्यार..! पहा नेमके काय चालू आहे राजकारणात

Advertisement
Advertisement

Leave a Reply