Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

आज सोन्याची चमक वाढली, चांदीच्या दरात मात्र कपात.. जाणून घ्या, सोने-चांदीचे नवीन भाव

मुंबई – आज गुरुवार आठवड्याच्या चौथ्या दिवशी सोने आणि चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price) अस्थिरता होती. एकीकडे सोन्याच्या दरात वाढ होत असतानाच चांदीच्या दरात घसरण झाली. अशा परिस्थितीत जर तुम्ही आज दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर घरातून बाहेर पडण्याआधी सोन्या-चांदीच्या नवीन किंमती जाणून घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. गुरुवारी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याच्या किमतीत 0.21 टक्क्यांनी वाढ (Increase In Gold Price ) झाली आणि त्याची किंमत 50,278 रुपये प्रति दहा ग्रॅम झाली आहे.

Advertisement

सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे, उलट चांदीच्या दरात (Silver Price) 0.65 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली. या कपातीनंतर चांदीचा भाव 60,757 रुपये प्रति किलोपर्यंत आला आहे. दागिने बनवण्यासाठी बहुतेक फक्त 22 कॅरेटचा वापर केला जातो. काही लोक 18 कॅरेट सोने देखील वापरतात. दागिन्यांवर कॅरेटनुसार हॉल मार्क (Hallmark) बनवले जाते. 24 कॅरेट सोन्यावर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहिले आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 11 महिन्यांत (एप्रिल-फेब्रुवारी) देशाची सोन्याची आयात 73 टक्क्यांनी वाढून $45.1 अब्ज झाली आहे. मागणी जास्त असल्याने सोन्याची आयात वाढली आहे. यासह, मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत सोन्याची आयात (Gold Import)$26.11 अब्ज होती. सध्याच्या काळात सोन्या चांदीते भाव सारखे बदलत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारही संभ्रमात पडले आहेत. रशिया युक्रेन युद्ध, महागाई आणि अन्य घटकांचा सोन्या चांदीच्या दरावर परिणाम होत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. आगामी काळात सोन्याचे भाव आणखी वाढणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

Advertisement

Gold Price : आज सोने-चांदीच्या दरात मोठा बदल; जाणून घ्या, काय आहेत सोन्याचे नवीन भाव

Advertisement
Advertisement

Leave a Reply