Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

मे ठरला तापदायक..! आम आदमीला दुहेरी झटका; आज पुन्हा वाढले गॅसचे दर.. जाणून घ्या..

मुंबई : मे महिन्यात देशातील आम आदमीला दुसरा झटका बसला आहे. घरगुती सिलिंडर (LPG Cylinder Price Today) पुन्हा एकदा खर्चिक झाला आहे. त्याचवेळी, आजपासून म्हणजेच 19 मेपासून व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीही वाढल्या आहेत. या महिन्यात घरगुती सिलिंडरच्या दरात दुसऱ्यांदा वाढ झाली आहे. 7 मे रोजी पहिल्यांदाच 50 रुपयांची वाढ करण्यात आली होती आणि आजही घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे.

Advertisement

पेट्रोल-डिझेलबरोबरच खाद्य पदार्थांच्या किमतीमुळे त्रस्त झालेले नागरिकही एलपीजीच्या वाढत्या किमतीमुळे हैराण झाले आहेत. नुकतेच 7 मे रोजी घरगुती एलपीजी सिलिंडर 50 रुपयांनी वाढले होते. त्यामुळे देशातील बहुतांश शहरांमध्ये एलपीजी सिलिंडरची (LPG Cylinder) किंमत 1000 रुपयांच्या पुढे गेली असली तरी दिल्ली मात्र मागे राहिले. आज घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात 3 रुपये 50 पैशांनी वाढ केल्यावर ही तफावत संपुष्टात आली आहे. आता संपूर्ण देशात घरगुती एलपीजी सिलिंडर 1000 च्या पुढे आहे. गेल्या एका वर्षात दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडर 809 रुपयांवरून 1003 रुपयांवर गेला आहे. आजपासून, 14.2 किलोचा घरगुती LPG सिलिंडर दिल्ली आणि मुंबईमध्ये 1003 रुपयांना आणि कोलकात्यात 1029 रुपयांना आणि चेन्नईमध्ये 1018.5 रुपयांना मिळेल.

Advertisement

7 मे रोजी एलपीजीच्या दरात झालेल्या बदलामुळे जिथे घरगुती सिलिंडर 50 रुपयांनी वाढला होता. तर 19 किलोचा व्यावसायिक सिलिंडर (Commercial LPG) सुमारे 10 रुपयांनी स्वस्त झाला. आज त्याचा दर 100 रुपयांनी वाढला आहे. आता 19 किलोचा सिलिंडर दिल्लीत 2354, कोलकात्यात 2454, मुंबईत 2306 आणि चेन्नईत 2507 रुपयांना विकला जात आहे.

Loading...
Advertisement

1 मे रोजी त्यात सुमारे 100 रुपयांची वाढ झाली होती. त्याच वेळी, मार्चमध्ये दिल्लीत 19 किलोच्या एलपीजी सिलिंडरची किंमत केवळ 2012 रुपये होती. 1 एप्रिलला ते 2253 वर आणि 1 मे रोजी 2355 रुपयांवर पोहोचले. गेल्या वर्षभरात व्यावसायिक सिलिंडरचे दर 750 रुपयांनी वाढले आहेत.

Advertisement

अर्र.. गॅस नंतर सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक झटका! ‘या’ पदार्थांची वाढणार किंमत

Advertisement
Advertisement

Leave a Reply