Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Agriculture News: मोदी सरकारविरोधात शेतकरी आक्रमक; पहा कशासाठी उतरले रस्त्यावर

Please wait..

इंदोर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गहू निर्यात बंदीला (ban on wheat export – In a statement) देशभरातील शेतकरी संघटनांचा (Farmers’ organizations strongly opposed) कडाडून विरोध आहे. किसान संघर्ष समिती आणि किसान मजदूर सेना (Kisan Sangharsh Samiti and Kisan Mazdoor Sena) या संयुक्त शेतकरी आघाडीशी (United Farmers Front) संलग्न संघटनेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने गहू उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे काम केले आहे. गव्हाच्या निर्यातीवर बंदी आणून शेतकरी आता गव्हाचे पीक मंडईत विकायला आणत असतानाच निर्यात धोरणात बदल करून शेतकऱ्यांचा गहू स्वस्तात खरेदी करण्यास व्यापाऱ्यांना मोकळीक दिली आहे.

Advertisement

Advertisement
Loading...

निर्यातबंदी उठवली नाही, तर संयुक्त किसान मोर्चाशी संबंधित सर्व संघटनांना तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा शेतकरी संघटनांनी सरकारला दिला आहे. संयुक्त किसान मोर्चाचे नेते श्री रामस्वरूप मंत्री, किसान संघर्ष समितीचे राज्य सचिव श्री दिनेश सिंह कुशवाह, किसान मजदूर सेना मध्य प्रदेशचे अध्यक्ष श्री बबलू जाधव आणि सचिव श्री शैलेंद्र पटेल म्हणाले की, शेतकरी मंडईत गहू विकण्यासाठी आणत असताना, केंद्र सरकारने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली (government has banned the export of wheat) आहे. निर्यातबंदीचे वृत्त येताच गव्हाच्या भावात प्रतिक्विंटल २०० ते ३०० रुपयांची घट झाली आहे. असं असलं तरी, मध्य प्रदेशातील मंडयांमध्ये गहू एमएसपीच्या खाली विकला जात होता आणि सरकारच्या या धोरणामुळे गव्हाचे भाव घसरले आहेत.

Advertisement

Advertisement

सरकारने निर्यातबंदी उठवली नाही, तर संयुक्त किसान मोर्चाशी संबंधित सर्व संघटना एकत्र येऊन आंदोलन करतील, असा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला आहे. सरकार शेतकरी हिताच्या घोषणा करते, मात्र प्रत्येक वेळी शेतकऱ्यांच्या विरोधातच निर्णय घेतात, असे शेतकरी नेत्यांचे म्हणणे आहे. गव्हाच्या निर्यातीवर बंदी घालणे हाही शेतकरी विरोधी निर्णय आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. सरकारने तातडीने स्थगिती द्यावी. (price of wheat has gone down)

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply