Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

BSNL चे तीन जबरदस्त प्लान.. फायदे मिळतात अमर्याद, किंमतीतही कमी; जाणून घ्या, डिटेल..

मुंबई – सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL अनेक उत्तम प्रीपेड प्लान (Prepaid Plan) ऑफर करते, ज्यामध्ये तुम्हाला कॉल आणि डेटासह इतर फायदे दिले जातात. बीएसएनएलच्या अनेक प्लान आहेत, ज्यासमोर इतर टेलिकॉम कंपन्या टिकू शकत नाहीत. येथे आम्ही तुम्हाला बीएसएनएलच्या अशा 3 प्लानबद्दल सांगत आहोत, ज्यामध्ये तुम्हाला कमी किंमतीत दीर्घ वैधता दिली जात आहे.

Advertisement

बीएसएनएलचा 447 रुपयांचा प्लान
कंपनीचा 447 रुपयांचा प्लान 60 दिवसांच्या वैधतेसह (Validity) येतो. या प्लानमध्ये तुम्हाला 100 GB डेटा दिला जातो. विशेष म्हणजे हा डेटा ( Internet Data) वापरण्यासाठी कोणतीही दैनंदिन मर्यादा नाही. हे लक्षात घेण्यासारखे आहे की वेबसाइटवर ‘डेटा व्हाउचर’  (Data Voucher) असे वर्णन केले गेले असले तरीही ते अमर्यादित व्हॉइस कॉल (Voice Call) आणि दररोज 100 एसएमएस (SMS) ऑफर करते. यामध्ये युजर्सना BSNL Tunes आणि Eros Now चे मोफत सबस्क्रिप्शन (Free Subscription) देखील मिळते.

Advertisement

बीएसएनएलचा 499 रुपयांचा प्लान
यादीतील दुसरा प्लान 499 रुपयांचा आहे. या प्लानमध्ये तुम्हाला तीन महिन्यांची पूर्ण वैधता मिळते. म्हणजेच ते 90 दिवस टिकेल. यामध्ये दररोज 2 जीबी डेटा दिला जातो. अशा प्रकारे तुम्हाला एकूण 180 GB डेटा मिळेल. याबरोबरच अनलिमिटेड व्हॉईस कॉल आणि दररोज 100 एसएमएस उपलब्ध आहेत. यामध्ये ओटीटी सबस्क्रिप्शन नाही.

Loading...
Advertisement

बीएसएनएलचा 599 रुपयांचा प्लान
तिसरा आणि शेवटचा प्लान 599 रुपयांचा आहे. हा प्लान 84 दिवसांचा आहे. यामध्ये दररोज 5 जीबी डेटा मिळतो. अशा प्रकारे एकूण 420 GB डेटा मिळतो. याबरोबरच अनलिमिटेड व्हॉईस कॉल आणि दररोज 100 एसएमएस दिले जातात. प्लानमध्ये झिंग अॅप मोफत सबस्क्रिप्शन दिले आहे.

Advertisement

खुशखबर.. देशातील ‘या’ शहरात लवकरच सुरू होणार BSNL 4G; पहा, काय आहे कंपनीचा प्लान

Advertisement
Advertisement

Leave a Reply