Take a fresh look at your lifestyle.

वाव.. ‘या’ आहेत तुमच्या बजेटमधील कार; किंमत कमी अन् फिचर जबरदस्त; जाणून घ्या, डिटेल..

मुंबई – कार घेणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण योग्य बजेट (Budget) नसल्यामुळे बऱ्याच जणांचे कार घेण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहते. मात्र, आता कार खरेदी करणे खूप सोपे झाले आहे. कमी किमतीत चांगल्या फीचर्ससह वाहने येत असताना, नवीन कार खरेदी करण्यासाठी फायनान्स सुविधाही (Finance Service) सहज उपलब्ध आहे. तुमचे बजेट पाच लाख रुपयांच्या आत असेल तर तुम्हीही चांगली कार खरेदी करू शकता. कारण, कंपन्यांनी कमी किंमतीत काही चांगल्या कार आणल्या आहेत.

Advertisement

रेनॉ क्वीड (Renault Kwid)
युरोपियन ब्रँड Renault ने अनेक प्रगत वैशिष्ट्यांसह आपले नवीन मॉडेल KWID MY22 लाँच केले आहे. त्याची सुरुवातीची किंमत 4.49 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. या कारचे पहिले मॉडेल कंपनीने 2015 मध्ये लाँच केले होते. नवीन Renault Kwid डिझाइन आणि आधुनिक वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. नवीन KWID MY22 मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायांसह 0.8L आणि 1.0L SCe पॉवर ट्रेनमध्ये उपलब्ध आहे.

Advertisement

मारुती अल्टो (Maruti Alto)
मारुती सुझुकी अल्टोला पॉवरसाठी 3-सिलिंडर, 12-व्हॉल्व्ह, 796 cc BS-6 इंजिन देण्यात आले आहे. त्याचे इंजिन 6000 rpm वर 48PS ची कमाल पॉवर आणि 3500 rpm वर 69Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. त्याचे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनने सुसज्ज आहे. या कारची किंमत 3 लाख 39 हजार रुपये आहे. देशभरात या कारला चांगली मागणी देखील आहे. कमी किंमतीत कंपनीने या कारमध्ये अनेक चांगले फिचर दिले आहेत.

Advertisement

ह्युंदाई सँट्रो (Hyundai Santro)
या कारच्या खरेदीदारांना मे महिन्यात 28 हजार रुपयांचा डिस्काउंट (Discount) मिळत आहे, ज्यामध्ये रोख सवलत, एक्सचेंज बोनस, कॉर्पोरेट डिस्काउंट यांचा समावेश आहे. इंजिनबद्दल सांगितले तर, Hyundai ला 1.1-लीटर Epsilon mpi पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, त्याचे CNG प्रकार देखील उपलब्ध आहे. ह्युंदाई सॅन्ट्रोच्या बेस मॉडेलमध्ये मोटर ड्रायव्हन (इलेक्ट्रिक) पॉवर स्टीयरिंग, एअर कंडिशन, फ्रंट पॉवर विंडो, रिअर सीट बेंच फोल्डिंग, रिमोट टेलगेट ओपन यांसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. या कारची किंमत 4 लाख 89 हजार रुपये आहे.

Advertisement

वाव.. ‘या’ आहेत आपल्या बजेटमधील कार; किंमत आणि फिचर ऐकून वाटेल आश्चर्य; जाणून घ्या..

Advertisement
Advertisement

Leave a Reply