Take a fresh look at your lifestyle.

सरकारच्या मदतीने सुरू करा ‘हा’ बिजनेस; चांगल्या उत्पन्नाची मिळेल हमी; वाचा महत्वाची माहिती..

अहमदनगर : नोकरी करणारे बहुतेक लोक स्वतःचा काहीतरी बिजनेस (Business) सुरू करण्याचा विचार करत असतात. कोरोनानंतर लोक आपला व्यवसाय सुरू करण्यावर अधिक भर देत आहेत. तो व्यवसाय घरुन होणारा असेल किंवा गावातून सुरू होणारा असेल तर जास्त फायदेशीर ठरते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका बिजनेसची माहिती (Business Idea) देणार आहोत जो तुम्ही अगदी घरुन सुद्धा सुरू करू शकता. विशेष म्हणजे, यासाठी तुम्हाला सरकारकडून मदत देखील मिळेल.

Advertisement

हा व्यवसाय पापड व्यवसायातील गुंतवणूक (Investment In Papad business) आहे, जो तुम्ही तुमच्या घरून सुरू करू शकता. तुम्ही अगदी कमी पैशात याची सुरुवात करू शकता आणि तुमच्या पापडाची चव जर अनोखी आणि खास असेल तर तुम्ही पापड व्यवसायातही मोठा नफा कमवू शकता.

Advertisement

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळाने (NSIC) यासाठी प्रकल्प अहवाल (Project Report) तयार केला आहे. यामध्ये मुद्रा योजनेंतर्गत 4 लाख रुपयांचे कर्ज (Loan) स्वस्त दरात उपलब्ध होणार आहे. अहवालानुसार, एकूण 6 लाख रुपयांच्या गुंतवणुकीसह सुमारे 30,000 किलो उत्पादन क्षमता तयार केली जाईल. या क्षमतेसाठी 250 चौरस मीटर जमीन लागणार आहे.

Advertisement

या खर्चामध्ये स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल दोन्ही समाविष्ट आहे. अहवालानुसार, स्थिर भांडवलामध्ये 2 मशीन, पॅकेजिंग मशीन उपकरणे आणि खेळत्या भांडवलामध्ये तीन महिन्यांतील कर्मचार्‍यांचे तीन महिन्यांचे पगार, कच्चा माल आणि उत्पादन खर्च यांचा समावेश होतो. याशिवाय भाडे, वीज, पाणी, टेलिफोन बिल आदी खर्चाचाही यात समावेश आहे.

Advertisement

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी किमान 250 चौरस फूट जागा आवश्यक आहे. याशिवाय 3 अकुशल कामगार, 2 कुशल कामगार आणि एका पर्यवेक्षकाची आवश्यकता असेल. हे सुरू करण्यासाठी तुम्हाला 4 लाख रुपयांचे कर्ज मिळेल. यानंतर तुम्हाला फक्त 2 लाख रुपये गुंतवावे लागतील. कर्ज घेण्यासाठी तुम्ही पंतप्रधान मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत कोणत्याही बँकेत अर्ज करू शकता. कर्जाची रक्कम 5 वर्षांपर्यंत परत केली जाऊ शकते.

Advertisement

पापड तयार केल्यानंतर तो घाऊक बाजारात विकावा लागतो. याशिवाय किरकोळ दुकाने, किराणा दुकाने, सुपर मार्केटशी संपर्क साधून त्याची विक्री वाढवता येते. एका अंदाजानुसार, जर तुम्ही एकूण 6 लाख रुपये गुंतवले तर तुम्ही महिन्याला 1 लाख रुपये सहज कमवू शकता. यामध्ये तुमचा नफा 35000-40000 पर्यंत असू शकतो.

Advertisement

वाव.. फक्त 10 ते 15 हजारांत सुरू करा ‘हे’ बिजनेस.. कमी वेळेत मिळेल चांगले उत्पन्न..

Advertisement
Advertisement

Leave a Reply