Take a fresh look at your lifestyle.

कंगाल पाकिस्तानने भारताबाबत घेतला महत्वाचा निर्णय.. पहा, काय आहे नव्या सरकारचा प्लान..

दिल्ली – पाकिस्तानमध्ये नवीन सरकारच्या स्थापनेनंतर पाकिस्तानने मंगळवारी नवी दिल्लीत व्यापार मंत्र्याच्या नियुक्तीला मान्यता दिली. 2019 च्या अखेरीस जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या नेतृत्वात पाकिस्तानने भारताबरोबरचा सर्व व्यापार बंद केला होता. पण आता पाकिस्तानच्या या ताज्या हालचालींमुळे नव्या सरकारचा भारताबरोबरचा व्यापार (Pakistan Trade With India) पूर्ववत सुरू करण्याकडे कल असल्याचे दिसून येत आहे.

Advertisement

भारताबरोबर व्यापार पुन्हा सुरू करण्यासाठी नवी दिल्लीत नवीन व्यापार मंत्र्याची नियुक्ती करण्यात आल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान हे भारताबरोबर व्यापार सुरू करण्याच्या विरोधात होते. नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयात व्यापार प्रतिनिधीची नियुक्ती ही नेहमीची प्रक्रिया असल्याचे सांगत पाकिस्तानने बुधवारी सांगितले की, भारताबरोबरच्या व्यापाराबाबत आपल्या धोरणात कोणताही बदल झालेला नाही.

Advertisement

नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयात व्यापार प्रतिनिधीची (Trade Representative) नियुक्ती करण्यात आली  आहे, असे मंगळवारी प्रसारमाध्यमांनी सांगितले. यामुळे दोन्ही शेजारी देशांमधील द्विपक्षीय व्यापारी संबंध पूर्ववत होतील अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. पाकिस्तानच्या वाणिज्य मंत्रालयाने बुधवारी एका निवेदनात म्हटले आहे की, “वाणिज्य मंत्रालय नवी दिल्लीतील व्यापार प्रतिनिधी (व्यापार आणि गुंतवणूक) या पदासह 46 देशांमध्ये 57 व्यापार मोहिमेचे व्यवस्थापन करते.” भारताबरोबरच्या व्यापाराबाबत पाकिस्तानच्या धोरणात कोणताही बदल झालेला नाही, असे मंत्रालयाने स्पष्ट केले.

Advertisement

दरम्यान, पाकिस्तानमध्ये गंभीर आर्थिक संकट आहे. देशात महागाई प्रचंड वाढली आहे. दरम्यान, आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झालेल्या पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) मदतीचा हात पुढे केला आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या नेतृत्वातील नवीन सरकारला दिलासा देत, IMF ने रखडलेले बेलआउट पॅकेज एक वर्षाने वाढ करण्यास आणि कर्जाची रक्कम $8 अब्ज पर्यंत वाढ करण्यास सहमती दर्शविली आहे.

Advertisement

एक्स्प्रेस ट्रिब्यूनने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, पाकिस्तानचे (Pakistan) नवे अर्थमंत्री आणि IMF चे उपव्यवस्थापकीय संचालक यांच्यात वॉशिंग्टनमध्ये झालेल्या महत्त्वपूर्ण चर्चेनंतर हा करार केला आहे. आयएमएफने मान्य केले आहे, की हा कार्यक्रम सप्टेंबर 2022 अखेरपासून आणखी नऊ महिने ते एक वर्ष वाढ केला जाईल, तर कर्जाचा (Loan) आकार सध्याच्या $6 बिलियन वरून $8 अब्ज पर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला जाईल.

Advertisement

भारतानंतर पाकिस्ताननेही दिला WHO ला धक्का; जाणुन घ्या संपूर्ण प्रकरण

Advertisement

अर्र.. पाकिस्तान घाबरला..! नव्या पंतप्रधानांनी अमेरिकेबाबत केले मोठे वक्तव्य; जाणून घ्या..

Advertisement
Advertisement

Leave a Reply