Take a fresh look at your lifestyle.

Gold Price : आज सोने-चांदीच्या दरात मोठा बदल; जाणून घ्या, काय आहेत सोन्याचे नवीन भाव

मुंबई – गेल्या व्यापार सत्रातील नफ्यानंतर बुधवारी मौल्यवान धातूंच्या किमतीत पुन्हा एकदा घसरण झाली आहे. जर तुम्ही सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज एक चांगली संधी आहे, परंतु घरातून बाहेर पडण्यापूर्वी त्यांची नवीन किंमत (Gold And Silver Price) नक्कीच तपासा, ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. बुधवारी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये (Multi Commodity Exchange) सोन्याच्या किंमतीत (Gold Price) 0.46 टक्क्यांनी घसरण झाली आणि त्याचे दर 50 हजार 352 रुपयांपर्यंत पोहोचले.

Advertisement

सोन्याबरोबरच आणखी एक मौल्यवान धातू चांदीच्या दरातही (Silver Price) बुधवारी घट झाली. चांदीच्या दरात 0.55 टक्क्यांनी घसरण झाली असून या घसरणीनंतर चांदीचे दर 60 हजार 286 रुपये प्रति किलोवर आले आहेत. दागिने बनवण्यासाठी बहुतेक फक्त 22 कॅरेटचा वापर केला जातो. काही लोक 18 कॅरेट सोने देखील वापरतात. दागिन्यांवर कॅरेटनुसार हॉल मार्क (Hallmark) बनवले जाते. 24 कॅरेट सोन्यावर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिलेले असते.

Advertisement

तसे पाहिले तर देशात सोन्याला कायमच मागणी असते. चांगला मुहूर्त किंवा सण उत्सवाच्या वेळी सोने खरेदी केली जाते. तसेच पैशांची सुरक्षित गुंतवणूक (Safe Investment of Money) म्हणूनही सोने खरेदीला लोक प्राधान्य देतात. त्यामुळे आपल्याकडे सोन्याला नेहमीच मागणी असते. कोरोनाकाळातही देशभरात सोन्याला मागणी (Gold Demand Increase In Corona) वाढली होती.

Advertisement

दुसरीकडे, पेट्रोलियम उत्पादने, अभियांत्रिकी वस्तू, रत्ने आणि दागिने आणि रसायने क्षेत्रातील उत्तम कामगिरीमुळे देशाची वस्तू निर्यात 2021-22 या आर्थिक वर्षात $418 अब्ज डॉलरच्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी नुकतीच आर्थिक वर्ष 2021-22 साठी व्यापाराची आकडेवारी जाहीर करताना ही माहिती दिली. आकडेवारीनुसार, 2021-22 या वर्षात भारताच्या कमोडिटी व्यापाराने (Export And Import) एक ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा पार केला आहे कारण देशाची आयात देखील $610 अब्ज डॉलरच्या सर्वकालीन सर्वाधिक पातळीवर पोहोचली आहे.

Advertisement

खुशखबर..! सोने खरेदीची आहे संधी.. आज सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या, काय आहेत नवीन दर

Advertisement

फक्त 5 दिवसांत सोन्या-चांदीच्या दरात मोठी कपात.. सोने खरेदीआधी जाणून घ्या नवे दर..

Advertisement
Advertisement

Leave a Reply