अमेरिकेचा मोठा निर्णय..! ‘त्यासाठी’ युक्रेनला दिलेत 40 अब्ज डॉलर्स; रशियाची डोकेदुखी वाढणार..
दिल्ली : रशिया विरोधातील युद्धात असलेल्या युक्रेनला अमेरिकेने आणखी मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. लष्करी मदतीबरोबरच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Jo Biden) यांनी युक्रेनला 40 अब्ज डॉलर (सुमारे तीन लाख कोटी रुपये) मदत देण्याच्या प्रस्तावाला (Proposal) मंजुरी दिली आहे. त्यांनी सोमवारी या ठरावावर स्वाक्षरी केली. लष्करी मदतीचा भाग म्हणून अमेरिका युक्रेनला गुप्तचर माहितीही देत आहे. अमेरिकेच्या (America) मदतीमुळे युक्रेनने अनेक रशियन लष्करी अधिकार्यांना ठार मारण्याव्यतिरिक्त रशियाची युद्धनौका बुडवण्यात यश मिळवले.
सेंटर फॉर युरोपियन पॉलिसी अॅनालिसिसच्या अध्यक्षा एलेना पॉलिकोवा यांनी सांगितले की, अमेरिका युक्रेनला लष्करी मदत तसेच आर्थिक मदत देत आहे जेणेकरून ते स्वतःचे संरक्षण करू शकतील. युक्रेनसाठी या आर्थिक मदतीला (Financial Help For Ukraine) अमेरिकेच्या रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक पक्षांच्या नेत्यांनी मान्यता दिली आहे.
रशियाने युक्रेनवर केलेल्या हमल्याच्या विरोधात संयुक्त आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न अमेरिका करत आहे. अमेरिकेच्या कर्ज धोरणामुळे (Americas Loan Polivcy) दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनीचा पराभव झाला. सोमवारी मॉस्कोमध्ये विजयी परेड दरम्यान रशियाने केलेल्या ताकदीच्या प्रदर्शनाला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेच्या या कारवाईकडे पाहिले जात आहे. दरम्यान, रशियाचे सैन्य युक्रेनमध्ये युद्ध गुन्हे (War Crime) आणि अत्याचार करत असल्याचे अमेरिकेच्या राष्ट्रपती भवन व्हाईट हाऊसने (White House) म्हटले आहे. सर्वसामान्यांना त्रास आणि नाहक विनाशाचा सामना करावा लागत आहे.
एपी या वृत्तसंस्थेनुसार, स्वीडन (Sweden) या आठवड्यात पाश्चात्य लष्करी संघटना नाटोमध्ये (NATO) सामील व्हायचे की नाही याचा निर्णय घेऊ शकतो. युक्रेनवरील रशियाच्या हमल्याने बलाढ्य शेजाऱ्याशी संघर्ष टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे कोणत्याही लष्करी संघटनेपासून दूर राहणे हा एक दीर्घकाळचा विश्वास मोडीत काढला आहे.
अमेरिका, नाटो आघाडीने रशिया हैराण..! केला ‘हा’ धक्कादायक आरोप; जाणून घ्या, युद्धाचे अपडेट..
बाब्बो.. ‘त्यामुळे’ वाढलेय जगाचे संरक्षण बजेट; पहा, अमेरिका, रशिया आणि भारताने किती केलाय खर्च..