Take a fresh look at your lifestyle.

Sri Lanka Crisis : श्रीलंकेवर आहे ‘इतके’ मोठे विदेशी कर्ज; रक्कम ऐकून तुम्हालाही बसेल धक्का..

दिल्ली – श्रीलंकेची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. देशात हिंसाचार (Violence) आणि जाळपोळीच्या घटना सातत्याने घडत आहेत. सरकार आणि अयोग्य धोरणांमुळे देशाच्या बिघडलेल्या स्थितीविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांनी अनेक नेत्यांसह पंतप्रधानांचे घर जाळले. श्रीलंकेसाठी या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग सध्या दिसत नाही. श्रीलंकेवर तब्बल 56 अब्ज डॉलरचे बाह्य कर्ज (56 Billion Dollar Foreign Debt) आहे. त्यातील दहा टक्के कर्ज एकट्या चीनचे आहे. त्याच्यासाठी ही रक्कम इतकी मोठी आहे की ती परत करण्याचा कोणताही मार्ग दिसत नाही. या कर्जावर श्रीलंकेला दोन अब्ज डॉलर्स फक्त व्याजाच्या (Interest On Loan) स्वरूपात द्यावे लागतील.

Advertisement

या परिस्थितीसाठी श्रीलंकेचे तज्ज्ञ तेथील सरकारला जबाबदार धरत आहेत. मात्र या परिस्थितीचा सर्वाधिक वाईट परिणाम तेथील सर्वसामान्य जनतेवर होत (Effect On Common Citizen) असल्याचेही वास्तव आहे. देशात अन्नधान्याची तीव्र टंचाई (Shortage Of Food) आहे. याशिवाय औषधांचीही (Medicines) मोठी कमतरता आहे. जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. परकीय कर्जाच्या परतफेडीचा विचार केला तर श्रीलंकेकडे 50 अब्ज डॉलर्सचा परकीय चलन साठा (Foreign Reserve) उरला नाही. अशा परिस्थितीत जुलैमध्ये विविध वित्तीय संस्था श्रीलंकेला डिफॉल्टर (Defaulter) म्हणून घोषित करण्याची दाट शक्यता आहे.

Advertisement

भारताबद्दल सांगितले तर या वर्षी जानेवारीपासून श्रीलंकेला $3.5 बिलियनची मदत दिली आहे. भारतासमोरील सर्वात मोठी अडचण अशी आहे की, श्रीलंकेला जे कर्ज परत करावे लागणार आहे ते भारत एकटाही परत करू शकत नाही. यामध्ये अनेक जोखीम घटकही गुंतलेले आहेत. श्रीलंकेने या परिस्थितीतून लवकरात लवकर सावरावे, अशी भारताची इच्छा आहे, हेही खरे आहे. कारण श्रीलंकेची दुर्दशा भारतासाठी घातक ठरू शकते. पुढे भयंकर अराजकता आणि गृहयुद्धाला जन्म देणारी अशी दुर्दशा दीर्घकाळ चालू राहावी, हे भारताचा शेजारी देश म्हणूनही आपल्या हिताचे नाही.

Advertisement

परराष्ट्र धोरणाबाबत बोलताना भारत नेहमीच नेबर फर्स्ट या धोरणावर काम करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही वेगवेगळ्या मंचांवरून अनेकदा हे सांगितले आहे. पण इथली परिस्थिती नियंत्रणात आणणे हे एकट्या भारताचे काम नाही. भारतानेही शेजार धर्माचा विचार करत श्रीलंकेला औषधे आणि धान्याची मदत पाठवली आहे.

Advertisement

श्रीलंकेच्या SAARC फ्रेमवर्क व्यवस्थेद्वारे भारताने $400 दशलक्ष मदत दिली. याशिवाय, आरबीआयने आशियाई क्लिअरिंग युनिट अंतर्गत $1.5 बिलियनची मदत दिली. यानंतर, इंधन खरेदीसाठी $ 50 कोटी डॉलरची व्यवस्था करण्यात आली. यानंतर भारताने औषध, अन्नधान्य यासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी पुन्हा एक अब्ज डॉलर्सची रक्कम दिली आहे. या दरम्यान 760 किलो औषधेही पोहोच करण्यात आली आहेत.

Advertisement

तिथल्या राजकीय अस्थिरतेमुळे श्रीलंकेला परदेशातून कर्ज मिळणेही कठीण होत आहे. हीच समस्या भारताचीही आहे. स्थिर सरकार नसताना भारताने श्रीलंकेला अधिक कर्ज देणेही चुकीचे असू शकते. श्रीलंकेचे गोटाबाया आणि राजपक्षे यांचे सरकार चीनला पाठिंबा देत आहेत. या सरकारच्या या धोरणाने आज देशाला या संकटाच्या उंबरठ्यावर आणले आहे.

Advertisement

.. म्हणून पाकिस्तान-श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय मालिका रद्द; जाणून घ्या, काय आहे कारण

Advertisement

चिन्यांचा खतरनाक खेळ..! फक्त श्रीलंकाच नाही तर तब्बल ‘इतके’ देश अडकलेत ‘त्या’ सापळ्यात..

Advertisement
Advertisement

Leave a Reply