Take a fresh look at your lifestyle.

महागाईचे संकट वाढले..! ‘त्यासाठी’ कंपन्यांनी केली ‘ही’ भन्नाट आयडीया.. पहा, काय होणार परिणाम..

दिल्ली – आता कंपन्यांनाही महागाईचा फटका बसत आहे. यामुळेच ग्राहकोपयोगी वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या FMCG कंपन्यांनी छोट्या पॅकेटचे वजन (Reduce weight of Small Packet) कमी करण्यास सुरुवात केली आहे. पार्ले (Parle) आणि ब्रिटानिया (Britannia) सारख्या कंपन्या ग्रामीण बाजारपेठेवर पकड कायम ठेवण्यासाठी छोट्या पॅकेटमध्ये वस्तू विकण्यावर अधिक भर देतात. लहान पॅकेज केलेल्या वस्तूंचा वाटा त्यांच्या एकूण विक्रीच्या 40 ते 50 टक्के आहे.

Advertisement

मात्र, महागडे खाद्यतेल, साखर आणि गव्हाच्या किमतीमुळे या कंपन्यांवर 2 रुपयांपासून ते 10 रुपयांपर्यंतच्या छोट्या पॅकेटचे वजन कमी करण्याचा दबाव निर्माण झाला आहे. गेल्या सहा महिन्यांत 10 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या प्रसिद्ध पारलेजी बिस्किटांच्या सर्व पॅकेटचे वजन सात ते आठ टक्क्यांनी कमी झाले आहे. महागाईमुळे केवळ खर्च करण्याची क्षमता कमी होत नाही तर कंपन्यांनाही याचा फटका बसत आहे. कारण किरकोळ किमतींपेक्षा घाऊक किमती (Increase in Wholesale Price) वेगाने वाढत आहेत. उदाहरणार्थ, वार्षिक आधारावर, मार्च तिमाहीत साखरेच्या किमतीत 7 टक्क्यांनी, तर काजूच्या किमतीत 35 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याशिवाय पॅकेजिंगचा खर्चही वाढला आहे. मार्च तिमाहीत लॅमिनेशन 20 टक्क्यांनी महाग झाले आहे. कोरुगेटेड बॉक्सच्या किमतीत 21 टक्क्यांनी वाढ झाली आहे. खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

Advertisement

प्रिया गोल्ड ब्रँड अंतर्गत बिस्किटांची विक्री करणारी सूर्या फूड अँड अॅग्रो कंपनीचे म्हणणे आहे की महागाईमुळे कंपनीचे कामकाज कठीण होत आहे. कंपनीचे संचालक शेखर अग्रवाल सांगतात की, आधी महागाई वाढली की वजन कमी करायचे, पण आता ही पद्धत काम करत नाही. आम्ही 5 रुपयांचे पॅकेट बंद करू शकतो किंवा 5 रुपयांच्या पॅकेटची किंमत 10 रुपयांपर्यंत वाढवू शकतो. आता आम्ही पाच रुपयांना कोणत्याही वजनाचे पॅकेट देऊ शकत नाही. सूर्या फूड अँड अॅग्रोच्या पोर्टफोलिओमध्ये (Portfolio) 5 ते 10 रुपये किंमतीच्या 70 टक्के उत्पादनांचा समावेश आहे. कंपन्यांचे म्हणणे आहे की, आमच्यावर लवकरच फक्त 10 रुपयांचे पॅकेट विकण्याचा दबाव येऊ शकतो.

Advertisement

कोरोनाला (Corona) रोखण्यासाठी चीनमधील (China) अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन (LOckdown) सुरू आहे. याचा परिणाम जागतिक पुरवठा साखळीवर (Influence in world Supply Chain) होत आहे. चीनमुळे जागतिक पुरवठा साखळी दीर्घकाळ प्रभावित राहिल्यास आगामी काळात महागाईचे संकट  (Inflation Crisis) आणखी वाढू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. महागाईचा सर्वाधिक परिणाम खाद्यपदार्थांवर होणार आहे.

Advertisement

अर्र.. गॅस नंतर सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक झटका! ‘या’ पदार्थांची वाढणार किंमत

Advertisement

वाढत्या महागाईतही सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी.. मोदी सरकार घेऊ शकते ‘तो’ निर्णय..

Advertisement
Advertisement

Leave a Reply